25 खोल्यांच्या बंगल्यात राहणाऱ्या या अभिनेत्याचे शेवटचे आयुष्य गेलं खूप गरिबीत; वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | बॉलीवूडच्या प्रसिद्धीला कायम अबाधित ठेवण्यामागे अनेक कलाकार मंडळींनी आपले जीवन वाहिले आहे. यातील अनेक कलाकार आज या जगात नाहीत मात्र त्यांच्या कामगिरीने ते अजरामर झाले आहेत. त्यातीलच एक हरहन्नरी अभिनेता म्हणजे भगवान दादा होय.

भगवान दादा यांनी आपल्या अभिनयासाठी संपूर्ण जीवन वाहिले. संपूर्ण आयुष्य त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या सेवेत घालवले. भोली सुरत, शोला जो भडके अशी अनेक सदाबहार गाणी आणि चित्रपट त्यांनी बॉलीवूडला दिले. भगवान दादांचा जन्म 1913 मध्ये अमरावती , महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भगवान आभाजी पालव असे होते. मात्र लोक त्यांना भगवान दादा म्हणून ओळखत होते.

त्यांचे वडील एक गिरणी कामगार होते. भगवान यांना लहापणापासूनच अभिनयाची आवड होती. भगवान दादा हे सिंधी कुटुंबातील होते. त्यांनी सुरुवातीला एक मजूर म्हणून काम केले, परंतु चित्रपटांचे स्वप्न त्यांच्या मनात कायम होते. त्यामुळे मूक चित्रपटांमधील काही भूमिकांसह त्यांना अभिनयात पाहिला ब्रेक मिळाला.

त्यांनी साल 1938 मध्ये चंद्रराव कदम यांच्यासोबत बहादूर किसान हा त्यांचा पहिला चित्रपट सहदिग्दर्शित केला. 1938 ते 1949 पर्यंत त्यांनी कामगार वर्गात लोकप्रिय असलेल्या कमी बजेटच्या स्टंट आणि अॅक्शन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या काळात त्यांनी बनवलेल्या उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक म्हणजे साल 1941 मध्ये आलेला तामिळ चित्रपट वाणा मोहिनी. ज्यात एमके राधा आणि श्रीलंकन ​​अभिनेत्री थवामणी देवी यांनी भूमिका केल्या होत्या.
1942 मध्ये ते जागृती पिक्चर्सचे निर्माते झाले.

त्यांनी काही जमीन खरेदी केली आणि 1947 मध्ये चेंबूरमध्ये जागृती स्टुडिओची स्थापना केली. राज कपूरच्या सल्ल्यानुसार , त्यांनी भगवान आणि गीता बाली अभिनीत आणि त्यांच्या मित्राच्या संगीतासह अलबेला नावाचा सामाजिक चित्रपट बनवला. चितळकर किंवा सी. रामचंद्र . चित्रपटातील गाणी, विशेषतः ‘शोला जो भडके’ आजही लक्षात आहेत. अलबेला जबरदस्त हिट ठरला. अलबेला नंतर भगवान, सी. रामचंद्र आणि गीता बाली हे दोघे झमेला या चित्रपटामध्ये पुन्हा एकत्र दिसले. त्यांनी साल १९५६ मध्ये भागम भाग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले तसेच यात त्यांनी अभिनयही केला.

भगवान दादा आपल्या कामामुळे खूप श्रीमंत झाले होते. त्यांच्याकडे त्या काळातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी सात वेगवेगळ्या ब्रँडच्या आलिशान गाड्या होत्या. तसेच त्यांच्याकडे 25 खोल्यांचा एक मोठा बंगला देखील होता. यावेळी त्यांचा हसते रेहना हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासाठी त्यांनी आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती दावाला लावली होती.

त्यांना वाटत होते की या चित्रपटातून ते खून कमाई करू शकतील. मात्र तसे झालेच नाही. त्यांचा हा चित्रपट फ्लॉप झाला. जवळ असलेला सर्व पैसा आणि गाडी बंगला त्यांना विकावे लागले. त्यानंतर बरेच दिवस ते एका चाळीत राहत होते. इथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि 4 फेब्रुवारी 2002 रोजी दादर येथील निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *