ओळखा पाहू! फोटोत दिसणारी तीन मुले सध्या गाजवत आहेत बॉलिवूड, फोटो पाहून तुम्हीही ओळखू शकणार नाही

दिल्ली | अनिल कपूर अभिनित मिस्टर इंडिया हा चित्रपट आजही अनेकांच्या पसंतीचा आहे. प्रत्येकाने हा चित्रपट आपल्या बालपणी नक्की पाहिला असेल. त्या काळी हा चित्रपट फार गाजला होता. चित्रपटात लहान मुलांची मोठी फौज असल्याने लहान मुलांना या चित्रपटाचे अधिक आकर्षण होते.

या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्री देवी यांनी अनिल कपूर बरोबर स्क्रीन शेअर केली होती. या दोघांची जोडी या चित्रपटातून खूप गाजली. चित्रपट त्यातील गाणी आणि कथेबरोबरच यातील चिल्लर पार्टीने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटात लहान मुलांची धमाल पाहून सगळेच आनंदी झाले होते. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

अशात आता या चित्रपटातील सर्वच बाल कलाकार आता मोठे झाले आहेत. यातील प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. मात्र यातील तीन मुलं ही सध्या बॉलीवूडचे स्टार झाले आहेत. तर आज या बातमीमधून स्टार झालेले ते बाल कलाकार नेमके आहेत तरी कोण हे जाणून घेऊ.

सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील एक फोटो खूप व्हायरल होतं आहे. यात अनिल कपूर सर्व बाल कलाकारांबरोबर बसला आहे. याच फोटोत ते तीन बाल कलाकार देखील आहेत.

व्हायरल होतं असलेल्या या फोटोत अनिल कपूरच्या उजव्या बाजूला हात वर करून टाळी वाजवताना जो मुलगा दिसतो आहे तो सध्याचा बॉलीवूड गाजवणारा अहमद खान आहे. त्याच्या पुढे जो मुलगा बसला आहे तो आफताब शिवदासानी आहे. तसेच अनिल कपूरच्या जवळ चश्मा लावून बसलेला मुलगा करण नाथ आहे.

करण नाथ हा आपल्याला “ये दील आशिकाना ” मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. मिस्टर इंडिया चित्रपटातील सर्वच बाल कलाकार उत्तम अभिनय करत होते. यातील अनिलच्या मांडीवर बसलेली चिमुकली देखील खूप गाजली होती. मात्र आता या तिघांव्यतिरिक्त बाकीचे सर्व बाल कलाकार अभिनय क्षेत्रापासून खूप दूर गेले आहेत.

या बाल कलाकारांपैकी कोणता बाल कलाकार तुम्हाला अधिक आवडला होता? तसेच यातील कोणत्या बाल कलाकाराच्या आयुष्यातील सद्य स्थिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *