दिग्गज अभिनेत्याचे निधन; अमिताभ बच्चन यांनी वाहिली श्रद्धांजली

पुणे | चित्रपटसृष्टीत काही दिवसात अनेक कलाकार हे जग सोडून गेले आहेत. यामुळे बऱ्याचदा चित्रपट विश्वात हळहळ व्यक्त होताना दिसली. याआधी चित्रपट विश्वात लता मंगेशकर, बप्पी लहरी, रमेश देव, राजू श्रीवास्तव हे या जगातून कायमचे दूर निघून गेले. अशाच दक्षिणात्य जेष्ठ कलाकाराच निधन झालं आहे.

ताटीनेनी रामा राव यांनी जगाचा निरोप घेतला. ताटिनेनी रामा राव हे साऊथ चित्रपट सृष्टीतील वरिष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जायचे. गेल्या काही दिवसात त्यांची तब्येत खालावली होती. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल करून त्यांच्यात एक विशेष सुधारणा झाली. 20 एप्रिल रोजी तब्येत खळबल्यान त्यांचं निधन झालं.

ताटिनेनी रामा राव यांचे चित्रपट – ताटिनेनी रामा राव यांनी जीवनधारा, संसार, आंधा काणून, लोक परलोक, बुलंदी अशा दिग्गज चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. ते हिंदी चित्रपट सृष्टीत चांगलेच सक्रिय होते. त्यांचां लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे.

दिग्दर्शक म्हणून केलेलं काम – ताटिनेनी रामा राव हे एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून देखील ओळखले जायचे. त्यांनी दोस्ती दुष्मनी, आखरी रस्ता, अरुल, युथ अशा दिग्गज चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *