लगीर झालंजी मालिकेतील दिग्गज अभिनेत्याचे निधन; मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा

मुंबई | आपल्या मुंबईत अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अशात रस्त्यावर चालताना रस्त्यात खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता हे गणित अजून तरी संपलेले नाही. याच खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. तर आता एका मोठ्या कलाकाराचा देखील या खड्यांनी जीव घेतला आहे.

लोकप्रिय मालिका लागीर झालं जी या मालिकेतील अभिनेते ज्ञानेश माने यांचे अपघातात निधन झाले आहे. रोजी येथून पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा घाटात अपघात झाला. या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तर त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे.

ज्ञानेश हे मूळचे बारामती येथील होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते तसेच ते रुग्णसेवेत देखील सक्रिय होते. त्यांना अभिनयाची देखील आवड होती त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात देखील काम करायला सुरुवात केली.

सोलापूर गँगवॉर, काळुबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबर्डा, पळशीची पीटी या चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर काम केले. तसेच लागीर झालं जी या मालिकेत त्यांनी नितीश बरोबर आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले आहे.

अद्यापही आपल्या महाराष्ट्रात घाट माथ्यावरून प्रवास करताना व्यवस्थित सुविधा नाहीत. त्यामुळे अशा अपघातात आजवर अगणित लोकांचे प्राण गेले आहेत. अशात आता या कलाकाराच्या निधनाने रस्ते सुरक्षा हा एक मोठा प्रश्न बनून समोर आला आहे. ज्ञानेश यांचे चाहते तसेच कला क्षेत्रातील सर्व मंडळी त्यांना सोशल मीडिया मार्फत आता भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *