ठरलं! ‘या’ तारखेला विद्युत लंडनमध्ये करणार लग्न; होणारी बायको आहे खूपच सुंदर

दिल्ली | मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत असून आता यामध्ये विद्युत जामवाल चा देखील लवकरच समावेश होणार आहे. नुकताच विद्युतचा ‘खुदा हाफिज 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, मात्र या चित्रपटातील विद्युतच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

या चित्रपटात त्याने अप्रतिम ॲक्शन सीन दिले आहेत. विद्युत त्याचा हर होणारी अभिनयासह दमदार शरीरयष्टीमुळे देखील ओळखला जातो. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षी त्याने त्याची गर्लफ्रेंड आणि फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीसोबत एंगेजमेंट केली तेव्हापासून दोघेही सतत चर्चेत असतात. अभिनेत्याचे आता लवकरच लग्न होणार असल्याची देखील चर्चा मोठी जोर धरू लागली आहे.

विद्युतची होणारी पत्नी नंदिता सध्या लंडनमध्ये असून विद्युतही लवकरच लंडनला रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच हे कपल लंडनमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांवर सध्या अशी देखील चर्चा सुरू आहे की या दोघांनी आधीच लग्न केलेल आहे मात्र आता पुन्हा एकदा सर्व मित्र परिवारासह त्यांना हा थाट पुन्हा एकदा घालायचा आहे.

हाय कसा अभिनेता आहे ज्याला सोशल मीडियावर आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायला अजिबात आवडत नाही. तो आपल्या खाजगी आयुष्याला कधीच चर्चेत येऊन देत नाही. त्यामुळे साखरपुडा होऊ नये बऱ्याच वर्षांनंतर त्याने गेल्यावर्षी दोघांच्या नात्याचा खुलासा केला होता. आता येत्या पंधरा दिवसांमध्ये हे दोघे एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार करताना दिसणार आहेत.

विद्युत जमवालचा जन्म जम्मू आणि काश्मीर , भारत येथे झाला. तो एका लष्करी अधिकाऱ्याच्या पोटी जन्मलेल्या तीन मुलांपैकी एक आहे आणि भारताच्या विविध भागांमध्ये (त्याच्या वडिलांच्या बदली करण्यायोग्य नोकरीमुळे) राहत होता आणि त्याने केरळच्या पलक्कड येथील आश्रमात कलारीपयट्टूमध्ये प्रशिक्षण घेतले होते.

तो तीन वर्षांचा होता तेव्हापासून त्याने मार्शल आर्टिस्टसचे विविध प्रकारात प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी त्याने अनेक देशांचा प्रवास केला, त्यापैकी काहींना कलारीपायट्टूमध्ये त्याने विजय मिळवला. जमवालने २५ हून अधिक देशांमध्ये प्रवास केलेला आहे.

जामवालने बॉलीवूडमध्ये जॉन अब्राहम अभिनीत 2011 च्या फोर्स चित्रपटाद्वारे पदार्पण केले , जो तमिळ भाषेतील काखा काखा या चित्रपटाचा रिमेक आहे. त्याने चित्रपटात नकारात्मक भूमिका केली आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार जिंकले.

2011 मध्ये जम्मवालने एनटीआर अभिनीत तेलुगू -भाषेतील शक्ती आणि ऊसरावेल्ली या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. 2012 मध्ये, जमवालने बिल्ला २ सोबत तामिळ सिनेमात पदार्पण केले , ज्याने त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली. त्याच वर्षी, त्याने अभिनेता विजयच्या विरुद्ध थुप्पाक्कीमध्ये विरोधी भूमिका केली, त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्याला चित्रपटासाठी नकारात्मक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा SIIMA पुरस्कार देखील मिळाला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *