एकाच परिवारातील चार भावंडांनी UPSC मध्ये मारली बाजी

मुंबई | यूपीएससी परीक्षा पास करून मोठा अधिकारी व्हायला हवं असं अनेकांना वाटतं. मात्र ही परीक्षा पास होण्यासाठी करावा लागणारा अभ्यास सर्वात जास्त असतो. उत्तर प्रदेशातील लालगंज जिल्ह्यातील एका कुटुंबामध्ये असलेल्या चार भावंडांनी ही परीक्षा पास केली आहे आणि ते चौघेही शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

या चारही मुलांचे वडील अशोक प्रकाश मिश्रा हे एका बँकेत मॅनेजर आहेत. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या मुलांच्या अभ्यासावरती जास्त लक्ष दिले. आपल्या मुलांनी शिकून काहीतरी मोठी कामगिरी करावी तसेच शासकीय नोकरी त्यांना मिळावी असे त्यांना वाटायचे. त्यामुळे अशोक यांनी आपल्या चारही मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. त्यांच्या याच कष्टाचे आता चीज झाले आहे.

अनिल यांच्या सर्वात मोठ्या मुलाचे नाव योगेश मिश्रा असे आहे. योगेश यांनी आपल्या लालगंज गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलाहाबाद येथील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी इंजीनियरिंगचे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असताना नोएडा येथे त्यांनी नोकरी देखील केली. साल 2013 मध्ये त्यांच्या परिश्रमाला यश मिळाले. यूपीएससी परीक्षा पास करून आता ते आयएएस ऑफिसर म्हणून शासकीय सेवा देत आहेत.

आपल्या भावाप्रमाणेच क्षमा मिश्राने देखील शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इलाहाबादमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने देखील यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. मात्र तिचे पहिले तीन प्रयत्न यशस्वी ठरले. तरीदेखील तिची जिद्द कायम होती. चौथ्या प्रयत्नांतीने यशाला गवसणी घातली. यूपीएससी परीक्षा पास करून आज ती आयपीएस अधिकारी आहे.

त्यानंतर त्यांची छोटी बहीण माधुरी मिश्रा तिने देखील असाच क्रम सुरू ठेवला. तिने देखील यूपीएससी परीक्षा पूर्ण करून आता ती झारखंड कॅडरची आयएस अधिकारी झाली आहे. आपल्या तिन्ही भावंडांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वात लहान भावाने देखील खूप मेहनत घेतली. लोकेश मिश्रा यांनी सन 2015 मध्ये यूपीएससी परीक्षेत 44 वा रँक मिळवला होता. सध्या तो झारखंडमध्ये आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलाने शिकून मोठ्या पदावर नोकरी करावी असे वाटते. आपल्या मुलांचे भवितव्य चांगले असल्यास प्रत्येक आई-वडिलांना आपले जीवन सार्थकी लागले असे वाटते. अनिल प्रकाश मिश्रा यांची चारही मुलं शासकीय सेवेत आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची मान आता अभिमानाने आणि गर्वाने उंचावली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *