चोर सोडून सन्याशाला फाशी, तुम्हीही दुचाकी चालवत असाल तर ही बातमी नक्की वाचा….

पुणे | सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे रोज कुणी ना कुणी प्रसिध्दी झोतात येत असतं. तसेच रोज लाखो व्हिडिओ इथे पोस्ट केले जातात ज्यातील काही व्हायरल देखील होतात. असाच एक व्हायरल व्हिडिओ आणि या व्हिडिओमागे दडलेलं सत्य या बातमीतून जाणून घेणार आहोत.

एक महिला आणि एक पुरुष या दोघांचा रस्त्यावर स्कूटी चालवत असताना अपघात होतो. दोघे रस्त्यावर पडतात. त्यांच्या मागे एक तरुण त्याच्या गाडीने प्रवास करत असतो. त्यांनतर महिला त्यांच्या मागे असलेल्या दुचाकी स्वराला ओरडू लागते. ती म्हणते की, तूच आमच्या गाडीला धक्का दिला त्यामुळे आम्ही खाली पडलो.

या सर्व प्रकारात त्या दुसऱ्या दुचाकी स्वाराची काहीच चूक नसते. त्यामुळे तो त्या महिलेला आणि पुरुषाला समजावत असतो. मात्र महिला त्याचं काहीच ऐकून घेत नाही. ती त्याच्यावर खूप ओरडते आणि त्याच्याकडून नुकसान भरपाई देखील मागू लागते. तर आता या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ त्या दुचाकी स्वाराच्या हेल्मेटमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या दुचाकी स्वाराची काहीच चूक नसते. समोर असलेल्या स्कूटीवरून एक स्त्री आणि एक पुरुष चाललेले असतात आणि त्यांच्या मागे हा दुचाकी स्वार बाईकवर असतो.

अचानक समोर असलेल्या स्कूटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते त्यामुळे ते दोघे खाली पडतात. यावेळी दुसऱ्या बाईकवर असलेल्या व्यक्तीचा त्यांच्या गाडीला जराही धक्का लागलेला नसतो. समोर कुणी पडलं आहे त्यांची मदत करण्यासाठी तो आपली गाडी थांबतो आणि मदतीला जातो.

मात्र त्याची ही मदत त्याच्याच अंगलट आलेली असते. पण त्याच्या कॅमेऱ्यात हे कैद झाल्याने तो बचावतो आणि खरं काय ते समजतं. त्यामुळे वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करून आणि पूर्ण लक्ष देऊन चालवले पाहिजे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. अनेक जण यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे त्या व्यक्ती कोण आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. अशात एका युजरने लिहिलं आहे की, ” वो तो कॅमेरा था, नाहीतो दीदी आपण खेलं खेल गाई थी” अशी कमेंट केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *