तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप! अभिनेत्री म्हणाली, मालिका सोडली आहे तरीही त्यांनी मला….

दिल्ली | तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका मोठा टीआरपी आसलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत आता पर्यंत सुरुवतीपासूनच असलेल्या कलाकारांनी खूप छान पद्धतीने ही मलिका चालवली मात्र आता यातील एक एक पात्र हळूहळू मालिका सोडत आहे. अशात या मालिकेचा एक भोंगळ कारभार याच मालिकेतील एका अभिनेत्रीने चव्हाट्यावर आणला आहे.

या मालिकेत तारक मेहताची पत्नी अंजली भाभी हे पात्र आधी अभिनेत्री नेहा मेहता साकारत होती. तिने अंजली भाभी या पत्राला पूर्ण पणे न्याय दिला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मनात असलेली एक
खदखद आता तिने व्यक्त केली आहे.

नेहा गेल्या दोन वर्षांपासून या मालीकेपासून दूर आहे. तिने ही मालिका साल २०२० मध्ये सोडली. त्यावेळी तिने कोणतीही माहिती न देता परस्पर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयाने त्यावेळी चाहते गोंधळात पडले होते. मात्र आता तिचं मालिका सोडण्यामागच कारण देखील स्पष्ट झालं आहे.

तिने सोशल मीडियावर मार्फत सांगितलं आहे की, ” तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडून मला दोन वर्षे झाली आहेत. तरीदेखील अजूनही दिग्दर्शकांनी मला माझं ठरलेलं मानधन दिलेलं नाही. यासाठी मी त्यांना खूप वेळा मेसेज केले आणि कॉल ही केले. मात्र ते कशालाच प्रतिक्रिया देत नाहीत. मानधन वेळेवर मिळत नसल्याने मी दोन वर्षांपूर्वी ही मालिका सोडली. त्यावेळी मी कोणालाच काही सांगितलं नव्हतं. मात्र आता मी गप्प बसू शकत नाही.”

अशाच आता तिच्या या पोस्ट वरती माध्यमांनी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या निर्मात्यांशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, ” नेहाने जेव्हा ही मालिका सोडली त्यावेळी तिने काहीही न सांगता हा निर्णय घेतला होता. तिने परस्पर घेतलेल्या निर्णयामुळे आमचं मोठं नुकसान झालं. त्यावेळी आम्ही तिला खूप कॉल आणि मॅसेज केले होते तसेच वारंवार मेल देखील करत होतो.

मात्र तेव्हा तिने कशालाच प्रतिक्रिया दिली नाही. जर तिने त्यावेळी मेलला प्रतिक्रिया दिली असती तर आता अशी पोस्ट शेअर करण्याची वेळ तिच्यावर आली नसती. तिने आमच्याशी मालिका सोडताना कोणतीच बातचीत केली नाही. कोणत्या कागदपत्रांवर देखील तिने सही केली नाही. त्यामुळे याप्रकरणी जर तेव्हा तिने मेल केला असता तर कदाचित चित्र वेगळे असते.”

नेहा ने तब्बल बारा वर्षे या मालिकेत काम केले आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेआधी ती रात होने को है आणि देस मे निकला होगा चाँद या मालिकांमध्ये झळकली होती. मालिकांसह तिने चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. छोट्या पडद्यावर झळकला आधी तिने गुजराती आणि तेलगु चित्रपटात अभिनय केला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *