तारक मेहता का उलटा चष्मामधील आणखी एका कलाकाराने सोडली मालिका; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मुंबई | तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिका आणि यातील पात्र चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. अशात या मालिकेतील काही कलाकार आता मालिका सोडत आहेत.

अनेक कलाकार ही मलिका सोडून गेले आहेत. नुकतीच तारक मेहता हे पात्र साकारत असलेल्या कलाकाराने ही मालिका सोडल्याने त्या जागी आता शैलेश लोढा अभिनय करताना दिसतो आहे. त्याने देखील तारक मेहता हे पात्र छान साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

यासह नट्टू काका हे पात्र देखील बदलले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिली आहे. असित मोदी यांनी याची माहिती दिली असून लवकरच आता वेगळे नट्टू काका अभिनय करताना दिसणार आहेत. अशात आता आणखीन एक अभिनेता ही मलिका सोडत असल्याची चर्चा रंगली आहे.

राज अनाडकट हा कलाकार तारक मेहता का उलटा चष्मामध्ये टप्पु हे पात्र साकारत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो मालिकेत दिसलेला नाही. तसेच तो शूटिंगला देखील जात नाही. त्यामुळे त्याने मालिका सोडली असावी असं अनेक जण म्हणत आहेत.

या मालिकेतील भिडे गुरुजी म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी या विषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ” एक कलाकार म्हणून राज या मालिकेत आहे की, नाही हे मला माहीत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो शूटिंगला आला नाही. त्याची तब्येत ठीक नाही. त्यामुळे त्याने ब्रेक घेतला आहे.”

राज अनाडकट साल २०१७ पासून या मालिकेत काम करत होता. काही दिवसांपूर्वी देखील त्याने मालिका सोडली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यावेळी तो त्याच्या कुटुबीयांबरोबर बाहेर फिरायला गेला होता. नंतर ती माहिती खोटी ठरली.

अशात आता भिडे गुरुजी म्हणजे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी संगतीले आहे की, त्याची तब्येत ठीक नाही. मात्र जर त्याचं इंस्टाग्राम अकाउंटवर पाहिलं तर तो आता देखील त्याच्या कुटंबीयांबरोबर सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतो आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *