खरोखरच तमाशा! तमाशा लाईव्हचा जबरदस्त ट्रेलर झाला प्रदर्शित…

मुंबई | “लोकांनी विचार केला असता तर टिव्ही बघितला आता का? फोडला असता…. “, “फक्त डिग्रीचा एक कागद मिळवला म्हणून कुणी पत्रकार होतं नाही.” डोक्याला विचार करायला भाग पाडणारे असे अनेक डायलॉग हे तमाशा लाईव्ह या चित्रपटातील आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.

तमाशा लाईव्ह हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यातील एका पेक्षा एक अशा दमदार गाण्यांनी चाहते पुरते वेडे झाले आहे. या गाण्यांना पाहण्याचा आणि त्यावर रील बनवण्याचा सगळ्यांना छंद लगला आहे असं म्हणायला
हरकत नाही.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये दिसते आहे की, सोनाली कुलकर्णी आणि सचीत पाटील हे दोन्ही कलाकार यात भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट देखील राजकीय वर्तुळाभोवती फिरणार आहे. तसेच सोनाली आणि सचीत हे दोघे एका पत्रकाराच्या भूमिकेत आहेत. एक पत्रकार आणि त्याची पत्रकारिता यावर खेळ रंगताना दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये “फक्त डिग्रीचा एक कागद मिळवला म्हणून कुणी पत्रकार होतं नाही.” हा डायलॉग ऐकून पत्रकारितेचा झालेला बाजार हे वास्तव समोर आणले जाणार असे दिसते आहे. तसेच यामध्ये बरीच गाणी आहे. प्रत्येक गाण्यात चित्रपटातील पुढील कथा आणि ट्विस्ट लपलेला आहे. एक गाणं झालं की, सीन असा काहीसा प्रकार दिसतो आहे.

ट्रेलर पाहून हा चित्रपट खूप रंजक असू शकतो असं म्हणायला हरकत नाही. गेल्या अनेक दवसांपासून या चित्रपटातील छंद लागला या गाण्यातून सोनाली कुलकर्णी दमदार प्रमोशन करताना दिसते. तसेच कडक लक्ष्मी या गाण्यात देखील चित्रपटाच्या कथेचा बराचसा भाग गुलदस्त्यात ठेवलेला आहे.

दिग्दर्शक संजय जाधव यांनी या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ” या चित्रपटात मी थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. संगीताच्या माध्यमातून हा चित्रपट पुढे जाणारा असून यातील प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा दडलेली आहे, जी चित्रपटाला पुढे नेते. याचे श्रेय मी संगीत टीमला देईन. कारण यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सीनला साजेसे गाणे, संगीत त्यांनी दिले आहे.

लोककलेला आधुनिकतेचे स्वरूप देण्यात आलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ची कथा एका अशा वेगळया वळणावर जाणार आहे, ज्याचा शेवट अतिशय रंजक असणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केली आहे. आमचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.” चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून आता चाहत्यांमध्ये चित्रपट पाहायचे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *