मी तीन वेळा लग्न करण्याचा प्रयत्न केला, पण… अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | दीलबर दिलबर या गाण्यातून संपूर्ण बॉलिवूड राज्य करणारी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन आजही अविवाहित आहे. तिने बॉलिवूडला आजवर अनेक हिट गाणी आणि चित्रपट दिले आहेत. फक्त तिच्या नावावरच नव्वदच्या दशकात तिकीट बारीवर गर्दी उफाळून येत होती. अशात तिने आता लग्न न करण्याचं तिच्या आयुष्यातील एक मोठ सत्य सगळ्यांना सांगितलं आहे.

सुश्मिताने आजवर अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केले. नुतीच मोठ्या ब्रेक नंतर ती आर्या या वेब सिरीजमध्ये दिसली होती. यातील तिचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. अशात अनेक व्यक्ती ती अजून अविवाहित आहे यासाठी तिच्या मुलींना जबाबदार ठरवतात. मात्र याचा तिने आता उलगडा केला आहे.

खरतर या गोष्टीचा खुलासा तिने ट्वींकल खन्नाच्या ट्विंकल इंडिया या शोमध्ये केला. यामधे तिने अविवाहित आण्याच कारण मुली नाहीत अशी माहिती दिली. तसेच यासाठी तिने देवाचे खूप आभार मानले. तिने आयुष्यात आता पर्यंत तीन वेळा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिन्ही वेळी मी बचावले असं तिचं म्हणणं आहे.

नुकतच तिचं बॉयफ्रेंड रोहमात शॉल बरोबर ब्रेकअप झालं आहे. मात्र अजूनही ते दोघे एकत्र येतात. तिच्या मिस युनिवर्सच्या २८ व्या पार्टीच्या सेलिब्रेशन वेळी देखील तो आला होता. तसेच दिघे सोशल मीडियावर कमेंट पोस्ट यांवर संवाद साधताना दिसतात. या दोघांच्या ब्रेकअपच कारण अजून स्पष्ट समजलेलं नाही.

सुश्मिताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ” मी माझ्या मुलींना सांभाळू शकते. मी माझी जबादारी कधीच वाटून नाही घेऊ शकत. माझ्या दोन्ही मुली खूप गोड आहेत. तसेच त्यांनी समाज आणि संस्कृती या दोन्हींचा स्वीकार केलेला आहे.” पुढे लग्नाबद्दल ती म्हणाली की, ” मी तीन वेळा लग्न करण्याचा प्रयत्न केला.

पण तिन्ही वेळा मी बचावले. माझ्या मुलींमुळे लग्न केलं नाही हे खोटं आहे. त्यांचा यासाठी काहीच विरोध नाही. पण हळूहळू मला काही गोष्टी कळत गेल्या त्याचा मी इथे काहीच उल्लेख करणार नाही. पण त्यामुळेच मी बचावले. माझ्या मुलींवर देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच मी तिन्ही वेळा बचावले.” असं तिचं म्हणणं आहे.

अशात सुश्मिताने साल १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ती एक सिंगल मदर आहे. या विजयानंतर तिने दोन मुली दत्तक घेतलेल्या. रेनी आणि अलीसा अशी या दोन्ही मुलींची नावं आहेत. साल १९९६ मध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर तिने ‘बीवी नंबर १’, ‘फिजा’, ‘मैं हूं ना’, ‘आंखे’, ‘मैने प्यार क्यूं किया’ असे अनेक यशस्वी चित्रपट बॉलिवूडला दिले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *