दिग्दर्शक सुधीर मिश्रा झाले अनाथ, कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

पुणे | प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुधीर मिश्रा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या आयुष्यातील अगदी जवळच्या व्यक्तीला गमावून ते अनाथ झाले आहेत. याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्वीटर अकाउंटवरून दिली आहे.

१४ जून रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ते खूप भावूक झाले आहे. आई शिवाय सारं जग पोरक वाटतं. आपण एकटे आहोत हे आई गेल्यावरच समजतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी… हे शब्द या पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाला लागू आहेत.

सुधीर यांनी १४ जून रोजी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ” माझी आई तासा भरापूर्वी मला सोडून गेली. तिच्या निधनाने मी खूप दुःखी झालो आहे. तिच्या शेवटच्या क्षणात मी आणि माझी बहिण तिच्याबरोबर होतो. आई नसल्याने मी आता अनाथ झालो आहे.”

त्यांची ही नोट पाहून सर्वजण त्यांचं सांत्वन करत आहेत. त्यांना या प्रसंगी अनेक कलाकारांनी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्मान खुराणा, मनोज वाजपेयी, अमृता राव, फरान अख्तर, दिव्यांका त्रिपाठी अशा अनेक छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांनी त्यांचं सोशल मीडियावर संत्वान केलं आहे.

ट्विटवर मनोज बाजपेयींनी लिहिलं आहे की, “तुम्हाला या कठीण काळातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो. देव तुमच्या आईच्या आत्म्याला शांती देवो.” तसेच अभिनेता आयुष्मान खुरणाने देखील ट्विट करत लिहिलं आहे की, “कृपया काळजी घ्या. मनापासून माझी सहानुभूती तुमच्यासोबत आहे. तुमची आई जिथे असेल तिथे आनंदी राहो.”

सुधीर यांनी आजवर जाणे भी दो यारो, मोहन जोशी हाजिर है, खामोश, ये वो मंजिल तो नही, मै जिंदा हू, धारावी, न्याय, कलकत्ता मेल, चमेली, खोया खोया चाँद, कॅन्टीन, गंभीर पुरुष अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *