रियल हिरो सोनू सूदचा आणखीन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल …

मुंबई | आजवर तुम्ही अनेक कलाकारांना गोर गरीबांची मदत करताना पाहिले असेल. कोणी जेवण तर कुणी जीवनावश्यक वस्तूंचे दान करत असतात. मात्र सोनू सूद सारखा दिलदार अभिनेता आजवर कोणत्या सिनेसृष्टीत झाला नाही. सोनू नेहमीच गोर गरीबांच्या सेवेत तत्पर असतो.

त्याने लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारला जे जमले नाही ते त्याने करून दाखवले. त्याने सर्व व्यक्तींना आपल्या गावी सुखरूप पोहचवण्याची व्यवस्था केली. आजूनही त्याचे सामाजिक कार्य तसेच सुरू आहे.

दररोज कलाकारांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमा होणे यात काही विशेष नाही. मात्र सोनू सूदच्या घराबाहेर जमणारी ही गर्दी नेहमीच विशेष असते. आजवर त्याने लाखो लोकांची मदत केली आहे.

त्याच्या घराबाहेर रोज अनेक व्यक्ती रांगेत उभे असतात. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन ते सोनू कडे येतात. अशात एवढ्या सगळ्यांना तोंड देत सोनू कधीच दमत नाही. तो सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला जमेल तेव्हढे प्रयत्न करत असतो.

अशात आता त्याच्या घराबाहेरील अशा गर्दीचा आणखीन एक फोटो तुफान व्हायरल होतं आहे. या मध्ये देखील त्याच्या घराबाहेरची मोठी रांग दिसते. सोनू घरातून बाहेर येऊन यातील प्रत्येकाचे प्रश्न एकूण घेतो आहे.

या व्हिडीओमध्ये एक रिक्षा चालक त्याच्या समस्या सांगता सांगता ओक्साबक्शी रडताना दिसतो आहे. तो रडता रडता सोनुचे पाय धरतो आहे. तसेच एका महिलेच्या पतीला कॅन्सर झाला आहे. तर एक महिला डायलिसिसची पेशंट आहे. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या समस्या लोक त्याच्याकडे घेऊन येत आहेत.

सोनूची ही मेहनत प्रत्येक माणसाला आपण आपल्या आयुष्यात गरजूंना मदत केली पाहिजे. ते आपल्या भारताचा एक भाग आहेत. आपण पुढे आलो तरच आपल्या देशातील सर्व समस्या सुटतील सर्वत्र एक दिवस आनंदी आनंद पाहायला मिळेल असं यातून समजतं.

अभिनेत्यांच्या घराबाहेर लोकांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना, मुंबईत एक घर असे आहे जे लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहे आणि ते घर सोनू सूदचे आहे. दररोज शेकडो लोक मदतीसाठी त्याच्या गेटबाहेर रांगेत उभे असतात आणि अभिनेता त्यांच्यापैकी कोणालाही निराश करत नाही. तो खरोखर आशेचे प्रतीक आहे.

सोनू सूद चित्रपटांमध्ये नेहमी खलनायकाच्या भूमिकेत जास्त दिसतो. रुपेरी पडद्यावर दिसत असलेला हा खलनायक खऱ्या आयुष्यात एका देवा पेक्षा ही मोठ काम करतो आहे. त्याने आजवर हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे. बॉलिवूडच्या दबंग या चित्रपटातून त्याने मोठी प्रसिध्दी मिळवली. लवकरच त्याचे फतेह आणि थामिलासरण हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *