खुशखबर! बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने दिला नवजात बाळाला जन्म….

दिल्ली | बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या प्रेग्नेंसी मुळे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर नुकतीच तिने आपल्या पतीबरोबर एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी ती प्रेग्नेंट असल्याचा खुलासातीने केला होता. सोनम ने आपल्या बेबी बंप बरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहत्यांची यांना भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोमध्ये तिला बाळासाठी आणि तिच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

अशात कालपासून सोशल मीडियावर सोनमचा एक फोटो तुफान वायरल होत आहे. फोटो पाहून चाहते खुश तर आहेत मात्र त्यांना थोडा धक्का देखील बसला आहे. तसेच अनेक जण चकित झाले आहेत. कारण या फोटोमध्ये सोनमने एका नवजात बाळाला जन्म दिल्याचे दिसत आहे. हे वाचून कदाचित आता तुम्हीही थोडे चकित झाले असाल.

कारण नुकतेच सोनमच्या बेबी शॉवर विषयी माहिती समोर आली होती. याच महिन्यात अनिल कपूर यांच्या मुलीचा बेबी शॉवर लंडनमध्ये संपन्न झाला होता. नुकताच बेबी शॉवर झाला आणि लगेचच बाळ जन्माला आलं हा नेमका काय प्रकार आहे याचा चाहते शोध घेत आहेत. अशात आम्ही देखील याविषयी माहिती शोधून काढले आहे.

यावेळी आमच्यासमोर अशी माहिती आली की, सोनमचा हा फोटो खोटा आहे. कोणीतरी हा फोटो एडिट केलेला आहे. यामध्ये सोनम हॉस्पिटलमध्ये झोपलेली दिसत असून तिच्या शेजारी नवजात बाळ देखील आहे. फोटो पाहून लक्षात येते की हा कोणत्यातरी दुसऱ्या महिलेचा फोटो आहे. यामध्ये चेहरा एडिट करून तिथे सोनमचा चेहरा लावण्यात आला आहे. सोनमच्या प्रेग्नेंसी विषयी आता ही बातमी समजल्यामुळे चाहते थोडे निराश झाले आहेत.

मात्र या बातमीमुळे सोनमच्या प्रेग्नेंसी बद्दल चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत. साल 2018 मध्ये सोनमने आनंद अहुजा बरोबर विवाह केला होता. बरेच वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर आता हे कपल पहिल्यांदाच प्रेग्नेंट होणार आहे. तसेच आता ते एका बाळाला जन्म देणार आहेत.

घरात एक लहान बाळ येणार त्यामुळे कपूर कुटुंबीय खूपच खुश आहेत. सोनमच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचं झाल्यास सध्या ती अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. तसेच बाळाला जन्म दिल्यानंतर देखील ती बराच काळ चित्रपटांपासून दूर राहील अशी माहिती समोर येत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *