काय तमाशा लावलाय… सोनाली कुलकर्णीचे एका मुलीबरोबर झालं जोरदार भांडण

मुंबई | आजकाल चित्रपट हिट व्हावा म्हणून कलाकार जोरदार प्रमोशन करताना दिसतात. यासाठी ते काय करतील आणि काय नाय याचा नेमच नाही. अशात गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर अगदी मेट्रो ट्रेन पासून ते विमानतळ पर्यंत तिच्या चंद्रमुखी चित्रपटाच प्रमोशन करताना दिसली. ती कुठे शांत होत आहे तोच आता सोनाली कुलकर्णी चाहत्यांसाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आली आहे.

तिच्या चॅलेंजच नाव आहे गिरकी. लवकरच सोनाली तिच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी तिने आताच जोरदार प्रमोशन करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर तिचा असाच प्रमोशनचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

तिच्या या व्हिडिओमधल चॅलेंज स्वीकारून तुम्हाला नक्कीच चक्कर येईल. कारण तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका लाल रंगाची चानियाचोली घातलेली दिसते आहे. तसेच ती यात मोठी गिरकी घेत आहे.

या व्हिडिओ मागे छंद लागला तुझा…. हे गाणं देखील वाजत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ पोस्ट करत सगळ्यांना गिरकी चॅलेंज दिलं आहे. तुमचा व्हिडिओ शूट करून मला पाठवा असं ती म्हणते आहे. तिचं हे चॅलेंज अनेक चाहत्यांनी स्वीकारलं असून अनेकांनी ही गिरकी घेतली आहे. लतसेच आपले व्हिडीओ पोस्ट करून तिला टॅग देखील केलं आहे.

आता हे तर ठीक होतं पण ती एका मुलीबरोबर या चॅलेंज वरून भांडताना देखील दिसली आहे. सोनालीने हा भांडणाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती अंजली नावाच्या एका मुलीला म्हणते आहे की, ” काय ग तुझे 1 मिलियन फॉलोवर आहेत म्हणे आणि तुझ्या रिल पण खूप व्हायरल होतात. तर तू मला गिरकी चॅलेंज करून दाखव.”

यावर ती मुलगी खाली बसून गिरकी घेत असते. त्यावर सोनाली चिढते आणि म्हणते, ” काय यार यांना काहीच कळत नाही काय तमाशा लावला आहे हा.” सोनालीच्या आगामी चित्रपटाच नाव तमाशा लाईव्ह असल्याने तिने हा मजेशीर भांडणाचा व्हिडिओ बनवला आहे.

तमाशा लाईव्हमध्ये ती पत्रकार शेफाली हे पात्र साकारणार आहे. तसेच यात तिच्याबरोबर सिद्धार्थ जाधव देखील मुख्य भूमिका साकारणार आहे. १५ जुलै रोजी हा चित्रपट तुम्हाला जवळच्या चित्रपट गृहात पाहता येईल.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *