बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री देत आहे मृत्यूशी झुंज; ‘या’ आजाराने आहे ग्रस्त

दिल्ली | महिला आणि त्यांना असणारे त्रास तसेच त्यावरील उपचार यावर अनेक व्यक्ती बोलत असतात. मासिक पाळी किंवा अन्य वयानुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा महिलांना त्रास होत असतो. अनेक महिला यामुळे आजारी पडतात तर काही यामध्ये मृत्यू देखील पावतात. अशात बॉलिवूडमधील एका सुप्रसद्ध अभिनेत्रीला एका आजारे ग्रासले आहे. ज्याची ती सध्या मोठी झुंज देत आहे.

कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन ही अभिनय क्षेत्रात खूप मोठी कामगिरी बजावते आहे. तिचे अनेक चित्रपट मोठे हिट ठरतात अशात आता तिला पिसिओस नावाचा आजार झाला आहे. हा आजार महिलांना होत असतो. त्यामुळे सध्या ती आपल्या तब्येतीवर लक्ष देत आहे. या आजारामुळे तिला होणारा त्रास असह्य आहे. तिला होणारा त्रास तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

श्रृतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामधे ती व्यायाम करताना दिसते आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने आपल्या आजाराची माहिती दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” माझ्यासोबत काम करा, मी माझ्या पीसीओएस आणि एंडोमेट्रिओसिससह काही सर्वात वाईट हार्मोनल समस्यांना तोंड देत आहे. महिलांना माहित आहे की असंतुलन आणि फुगवणे आणि चयापचय आव्हानांसह ही एक कठीण लढाई आहे.”

पुढे आपल्या आजाराला न भिता त्याला कसे तोंड दिले पाहिजे या विषयी तिने लिहिले आहे की, “परंतु याकडे झुंज म्हणून पाहण्याऐवजी मी ते स्वीकारणे निवडले आहे. माझे शरीर ज्या नैसर्गिक हालचालीतून जात आहे ते सर्वोत्तम आहे आणि मी बरोबर जेवण, चांगली झोपून आणि माझ्या वर्कआउटचा आनंद घेत या आजाराला थँक्यू म्हणते. माझे शरीर सध्या परिपूर्ण नाही पण माझे हृदय तंदुरुस्त आहे.”

तसेच अभिनेत्रीने पुढे महिलांना एक उपदेश देखील केला आहे. तिने लिहिले आहे की, ” आनंदी राहा आणि ते आनंदी हार्मोन्स वाहू द्या !! ! मला माहित आहे की हा एक छोटासा उपदेश आहे पण ही आव्हाने स्वीकारणे आणि त्यांना मला परिभाषित करू न देणे हा असा प्रवास आहे.. म्हणून….! तुम्हा सर्वांसोबत हे शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.”

तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच तिचे चाहते तिला लवकर बर वाटावं अशी प्रार्थना देखील करत आहेत. श्रृतीने अभिनय क्षेत्रात स्वतः च्या हिमतीवर नाव कमवले आहे. तिचे वडील कमल हसन यांना सगळेच ओळखतात. त्यांनी बॉलिवूड तसेच तोलिवूड खूप गाजवले होते. ती एक स्टार कीड असून देखील या गोष्टीचा तिने कधीच फायदा घेतला नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *