शोलेच्या गब्बरवर ही अभिनेत्री करत होती जीवापाड प्रेम; वय ६३ होऊन देखील आहे अविवाहित

दिल्ली | बॉलिवूड चित्रपटांची एक वेगळी परंपरा आहे. इथे चित्रपटातील अनेक जोड्या खऱ्या आयुष्यात देखील जुळल्या आहेत. तर काही जोड्या थोड्या काळासाठी एकत्र येऊन अजरामर झाल्या आहेत. एक दुजे के लिये, आशिकी या चित्रपटांच्या प्रेम कहाणी प्रमाणे बॉलिवूड कलाकारांच्या प्रेम कहाण्या देखील इतक्या रंजक आहेत की, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेम कहाणीवर देखील एखादा चित्रपट निघेल.

बॉलिवूडचा शोले हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. एका पेक्षा एक हिट डायलॉग आणि असे डायलॉग ज्यांनी चित्रपटातील प्रत्येक पात्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. चित्रपटाच्या नायकाप्रमाने खलनायक देखील दमदार असल्यास चित्रपट अधिक रंजक बनतो. शोलेमध्ये देखील गब्बर हे पात्र खूप गाजले. चित्रपटात गब्बरची भूमिका अभिनेते अजमद खान यांनी साकारली होती.

त्या काळी बॉलिवूडवर त्यांचा एक वेगळाच दबदबा होता. अशात त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आजही आहेत. तसेच त्या काळी अनेक अभिनेत्री त्यांच्यावर प्रेम करू लागल्या होत्या. एक अभिनेत्री तर त्यांच्यावर आजही जीवापाड प्रेम करते. विशेष म्हणजे त्या अभिनेत्रीने आजही त्यांच्या प्रेमासाठी लग्न केले नाही. अजमद यांच्या निधनानंतर देखील ही अभिनेत्री अद्याप अविवाहित आहे.

ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून परदेसी परदेसी या आयटम साँगमधील एक अभिनेत्री आहे. कल्पना अय्यर यांनी या गाण्यात आपल्या खतरनाक अंदाजाने सर्वांच्या काळजात धडकी आणली होती. त्यांचा हा अनोखा आंदाज आजही खूप गाजतो आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक आयटम साँग केले. तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये देखील परफॉर्मन्स केला आहे. त्यांचे चाहते आजही त्यांचा वेगळ्या धाटणीचा डान्स आणि शैली आवडीने पाहतात.

कल्पना या अजमद यांना आपले काळीज देऊन बसल्या होत्या. त्यांना अजमद खान खूप आवडायचे. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली होती. या दोन्ही कलाकारांचे अफेअर त्या काळी खूप गाजले. मात्र हे दोघे कधीच लग्न करू शकले नाही. कारण अजमद खान आधीच विवाहित होते. एका अपघातात त्यांना मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची अभिनयातील कारकीर्द लवकर संपली.

अजमद खान बराच काळ अंथरुणाला खिळले होते. अशात १७ जुलै १९९२ मध्ये वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे पुढे कल्पना यांनी देखील विवाह केला नाही. आता त्या ६३ वर्षांच्या झाल्या आहेत. मात्र अजूनही त्या अविवाहित आहेत. अनेक मुलाखतींमध्ये त्यांना लग्न विषयी विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी नेहमीच यावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *