अरर! ज्या चित्रपटांना ऋतिक रोशनने दिला होता नकार, त्यांनीच पुढे जाऊन कमावले कोट्यावधी रुपये… 

दिल्ली | प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्या कामानिमित्त वेगवेगळे निर्णय घेत असतो. या मधले काही निर्णय बरोबर निघतात मात्र काही निर्णय हे चुकतात. अभिनेता हृतिक रोशन यांनी देखील आपल्या आयुष्यात चित्रपटांसाठी बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेतले आहेत. या बातमीमधून त्याने रिजेक्ट केलेले पण बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारे काही चित्रपट पाहूयात.

 

लगान

2001 साली प्रदर्शित झालेला लगान हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ऑस्करसाठी त्याला अधिकृत प्रवेश देखील होता. हा चित्रपट पहिल्यांदा ऋतिकला ऑफर करण्यात आला होता. मात्र त्याने नकार दिला. नंतर ‘भुवन’ची मुख्य भूमिका अभिनेता आमिर खानकडे गेली.

 

स्वदेश

सुपरस्टार शाहरुख खानच्या आधी हा चित्रपट पहिल्यांदा ऋतिकला ऑफर करण्यात आला होता. मात्र त्याने या चित्रपटाला देखील नकार दिला होता. या चित्रपटाने त्यावेळी केवळ आर्थिक यश नाही तर समीक्षकांचीही मोठी प्रशंसा मिळवली होती.

 

पिंक पँथर 2 

पिंक पँथर 2 या चित्रपटासाठी दिग्दर्शकांनी ऐश्वर्या राय-बच्चन आणि ऋतिक रोशन या दोघांची निवड केली होती. मात्र या चित्रपटाला देखील ऋतिकने नकार दिला. हा चित्रपट जावई प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटाने देखील बक्कळ कमाई केली.

 

 

रंग दे बसंती

ऋतिक रोशन नाकारलेल्या आणि आमिर खानने स्वीकारलेला असा आणखीन एक चित्रपट मोठा हे ठरला. तो चित्रपट आहे रंग दे बसंती. सुरुवातीला हा चित्रपट देखील त्याच्याकडे गेला होता. तरी सरकार दिल्याने चित्रपट आमिर खान कडे आला. आमिरने या चित्रपटात दमदार अभिनय केला आणि हा चित्रपट देखील हिट ठरवला.

 

बाहुबली

ऋतिक रोशन एवढा वेडा होता की त्याने चक्क बाहुबली या चित्रपटाला देखील नकार दिला. प्रभासने बाहुबली हे पात्र साकारलं होतं मात्र त्याच्या आधी हा रोल ऋतिक कडे गेला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपण किती मोठी चूक केली आहे याचा अंदाज जर ऋतिकला नक्की झाला असेल.

 

तर हे होते ऋतिक रोशनने नाकारलेले पण बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेले काही चित्रपट यातील कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *