एकेकाळी बॉलिवुड गाजवणाऱ्या रीना रॉयची झालीय खूपचं वाईट अवस्था

मुंबई | पूर्वीच्या काळी अनेक अभिनेत्री या कमी मेकअपमध्ये देखील कमालीच्या सुंदर दिसत होत्या. त्यातीलच एक रीना. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट गाजवले. मात्र आता उतरत्या काळात त्याचा चेहरा निस्तेज झाला आहे. वृद्ध वयाच्या निशाने त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून अनेक जण चकित झाले आहेत. फोटो नेमका कुणाचा आहे हे देखील अनेकांना ओळखणे कठीण झाले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिले.

बॉलिवूडमधील अनेक स्टार्स एकमेकांना डेट करतात. अशात त्या काळात काहींनी एकमेकांशी लग्न केले तर काही जोडपे तुटले. या यादीत रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचीही नावे आहेत. या दोघांच्या अफेअरच्या बातम्या खूप दिवसांपासून चर्चेत होत्या, मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपचीही खूप चर्चा झाली. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील प्रेम फुलत होते.

दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते, पण हातकडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पूनम त्या दोघांमध्ये आली. या चित्रपटात तिघेही मुख्य भूमिकेत होते. शत्रुघ्न सिन्हा जेव्हा पूनमकडे लक्ष देऊ लागले तेव्हा रीना रॉय सेटवरच रागवायच्या.

त्यांचा सेटवरचा तणाव इतका वाढला की, एक दिवशी रागाच्या भरात रीना यांनी शत्रुघ्नला सांगितले- आजनंतर तू पूनमसोबत काम करणार नाहीस. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शत्रूही पूनमकडे आकर्षित झाले होते. हातकडीचे निर्माते पहलाज निहलानी यांनाही हे कळवण्यात आले कारण ते शत्रूचे चांगले मित्र होते, पण यावेळी ते रीनाच्या समर्थनात होते.

पहलाजला रीना आणि शत्रूसोबत आणखी एक ‘आँधी तुफान’ हा चित्रपट बनवायचा होता, पण जेव्हा त्यांनी या अभिनेत्रीकडे प्रस्ताव आणला तेव्हा त्यांना वेगळेच उत्तर मिळाले. रीना म्हणाल्या की, “तुझ्या मित्राला सांग. जर त्याने माझ्याशी लग्न केले नाही तर मी 8 दिवसात कोणाशीही लग्न करेन, असे मी ठरवले आहे.

त्याचे उत्तर त्याने दिले तरच मी तुझ्या चित्रपटात काम करेन.” रीना यांची ही शक्कल काही काम करू शकली नाही. 1980 मध्ये शत्रुघ्नने रीनाच्या ऐवजी पूनमशी लग्न केले. यामुळे शत्रुघ्न पहलाजच्या ‘आँधी तुफान’ या चित्रपटात राहिले पण रीना यांनी हा चित्रपट केला नाही. रीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बराच ब्रेक घेतला साल २००० मध्ये त्या रेफ्युजी या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यानंतर २००४ साली इना मीना डिका या शो मध्ये त्या आल्या. १९७२ ते १९८५ पर्यंत त्यांनी अभिनय केला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *