अरेरे! एवढी प्रसिद्ध अभिनेत्री असून देखील करते अशी काम; तिची दशा पाहून चाहते झाले चकित

मुंबई | आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. इथे वेगळ्या भाज्या, फळे, कडध्यान्य इत्यादी गोष्टींची लागवड होत असते. पूर्वी सर्वच व्यक्ती शेती या व्यकसायातून पोट भरत होते. मात्र आता आधूनिकीकारणामुळे सर्व काही बदलले आहे. अनेक व्यक्ती आता वेगवेगळ्या व्यवसायात नाव आणि पैसे कमवत आहेत. मात्र आपल्या मातीशी जोडली नाळ ही कधीच तुटू शकत नाही. याचेच दर्शन एका प्रसिध्द अभिनेत्रीने घडवून दिले आहे.

संतोषी मां या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रतन राजपूत. रतनने या मालिकेत खूप सुंदर अभिनय केला होता. यातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अशात आता सोशल मीडियावर तिचा एक फोटो तुफान व्हायरल होतं आहे. यामध्ये ती शेती करताना दिसते आहे. सध्या उच्च शिक्षित आणि बऱ्याच व्यक्ती शेती व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत.

अशात एक अभिनेत्री आणि तीही एवढी गाजलेली अभिनेत्री चक्क शेती करते आहे हे पाहून चाहते नुसते थक्क झाले आहेत. अगदी छोटा पडदा असो नाही तर मोठा यावर झळकणारी प्रत्येक अभिनेत्री वेगळ्याच ढंगात जगत असते. अशात रतन मात्र या सर्वांपेक्षा वेगळी असल्याचे तिने सिद्ध केले आहे.

सोशल मीडियावर तिचे शेती करतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये ती अगदी गावाकडील बायकांच्या पोशाखात दिसते. साडी नेसून तिने डोक्यावर पदर घेतला आहे. गुलाबी आणि हिरव्या रंगाची तिची साडी आहे. यावर तिने स्लीवलेस ब्लाउज घातला आहे. तसेच हातामध्ये गुलाबी बांगड्या घालून ती शेती करत आहे. यावेळी ती नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. साल २०२० मध्ये संतोषी मां ही मालिका प्रसारित झाली होती. ही मालिका आता संपली आहे.

या मालिकेने रतनला भरभरून प्रसिध्दी मिळाली. मात्र आता ती अभिनय क्षेत्रापासून दूर गेलेली दिसत आहे. या मालिके नंतर ती कोणत्याच मालिकेमध्ये किंवा मोठ्या पडद्यावर सुद्धा झळकले नाही. रतन नेहमीच लाईन लाईट पासून दूर राहिलेली आहे. जास्तीची झगमग तिला कधीच आवडलेली नाही.

बऱ्याच वेळी ती नो मेकअप लूकमध्ये स्पॉट झालेली आहे. रतन आधीच दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे तिला मेकअपची तशी गरजही नाही. आता ती अभिनय क्षेत्रापासून थोडी दूर गेली असली तरी युट्युब वरतीच स्वतःचे एक चॅनेल आहे. त्यावरती तिचं वेगवेगळे व्लॉग शेअर करत असते.

नुकतीच ती तिच्या गावी गेली आहे. बिहार मधील आवडी येथे तिचे गाव आहे. इथे आल्यावर तिने कांदे आणि हळद अशा पिकांच्या शेतीत ती रमली आहे. तिने याचा एक व्लॉग देखील बनवला आहे. जो तिने तिच्या यूट्यूब चैनल वर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते तिला आता निरनिराळ्या कमेंट करत आहेत. तिने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडला आहे का तसेच तिला शेती करणे एवढं का आवडतं? असे प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.

अशात व्लॉगमध्ये तिने म्हटल आहे की, ” मला शेती खूप आवडते. आपण स्वतः काहीतरी पिकवून ते खातो तेव्हा मिळणारा आनंद फार वेगळा असतो.” रतनच्या मनामध्ये शेती आणि शेतकऱ्यांविषयी अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच ती आपल्या बळीराजाचा नेहमीच आदर करते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *