रणबीर कपूरला दहावीत मिळाले होते फक्त एवढे गुण; रिझल्ट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांवर अभिनेता रणबिर कपूर चांगलाच गाजत आहे. त्याच्या शमशेरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो अनेक ठिकाणी मुलाखत देत असताना दिसत आहे. अशा आता चाहत्यांना रणबीरच्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या आहेत.

तो त्याची पत्नी आली आणि त्यांचं होणारं बाळ यामुळे दोघेही लाईन लाईटमध्ये आहेत. अशात कपूर घराण्यातील रणबिर कपूर कितवी शिकला आहे तुम्हाला माहित आहे का? तर आज या बातमीमधून त्याच्याच शिक्षणाविषयी जाणून घेणार आहोत.

कपूर घराण्याच्या गेल्या चार पिढ्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयात अगदी शंभर पैकी शंभर गुण मिळवलेल्या कपूर घराण्यातील सर्वच कलाकार अभ्यासात मात्र खूपच ढ होते. कपूर घराण्यातील बऱ्याच व्यक्ती दहावी सुद्धा पास होऊ शकलेल्या नाहीत. मात्र हा रेकॉर्ड रणबीरने मोडला होता.

तसा अभ्यास असतोही ढच होता. मात्र कशीबशी त्याने दहावी पास करून 53 टक्के मिळवले. कपूर खानदानातील पहिलाच दहावी पास झालेला मुलगा म्हणजेच रणबिर कपूर. अभ्यासात तसा हुशार नसल्याने कुटुंबीयांना असे वाटत होते की तो देखील नापास होईल. मात्र त्यांनी कपूर कुटुंबीयांचा दहावी नापास चा रेकॉर्ड ब्रेक केला आणि तो दहावीत उत्तीर्ण झाला. पहिल्यांदाच कपूर कुटुंबातील कोणीतरी दहावीत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या घरी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.

रणबीर कपूर सध्या त्याच्या शमशेरा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी जात आहे. अशात एका मुलाखतीमध्ये त्याने या गोष्टीचा खुलासा केला. त्याने स्वतः सांगितले की, ” मी दहावी पास होईल असं आमच्या घरात कोणालाच वाटत नव्हतं.

मात्र मी दहावी 53 टक्क्यांनी उत्तीर्ण झालो. त्यामुळे घरात सर्वच खुश होते. सिने विश्वास सर्वत्र मिठाई वाटण्यात आली. तसेच माझं कौतुक करण्यासाठी घरी मोठी पार्टी देखील आयोजित केली होती. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली.” असं त्याने सांगितलं.

मुलाखतीत पुढे त्याला विचारण्यात आले की, ” १० वी पास झाल्यावर ती विज्ञान किंवा गणित या विषयाची निवड केली होती का? ” त्यावेळी हसत तो म्हणाला की, ” नाही मी अकाउंट विषयी निवडला होता.” तसेच तो पुढे म्हणाला की, ” आमच्या कपूर कुटुंबीयातील चार पिढ्यांमध्ये माझे बाबा माझे आजोबा आणि माझे काका कोणीही दहावी उत्तीर्ण करू शकलेले नाही.” रणबीरच्या शिक्षणासंदर्भात आता ही चर्चा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याने दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडिओ पाहून सर्वजण त्याला वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *