फ्लर्टी बॉय रणबीर कपूर म्हणाला, आलियाच माझ्यासाठी डाळ भात आणि तंगडी कबाब आहे….

मुंबई | बॉलिवूडचा चॉकलेट आणि फ्लर्टी बॉय म्हणजेच रणबीर कपूर याने काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट बरोबर विवाह केला. अशात आता तो त्याच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. या सर्वांमध्ये काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं होता. ज्यामध्ये तो एका मुलीला प्रपोसज करताना दिसत होता.

तर आता रणबीरने त्याची पत्नी आलिया विषयी तो किती सिरियस आहे हे सांगतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रणबीर त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये म्हटला आहे की, “लग्न हे एक डाळ भाता सारखे आहे. आयुष्यात कधी तरी चिकन, तंगडी कबाब, तंदुरी या सर्व गोष्टी पण पाहिजेत.” आता या मध्ये डाळ भात म्हणजे आलिया आणि चिकन, तंगडी कबाब आणि बाकीचा तडका म्हणजे त्याच्या आता पर्यंत झालेल्या गर्लफ्रेंड आहेत.

त्याने एका मुलाखतीत हेच वाक्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. काही दवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात तो एका मुलीला प्रपोज करताना दिसला. मात्र नंतर ती मुलगी श्रद्धा कपूर असल्याचे समजले. त्यामुळे नंतर आता हा चॉकलेट बॉयला श्रद्धा आवडते का? अशा प्रश्नांना उधाण आलं.

मात्र तसं काही नसून हा व्हिडिओ त्या दोघांच्या आगामी चित्रपटातला असल्याचं समजलं आहे. अशात रणबीरच्या आयुष्यात आजवर एवढ्या मोठं मोठ्या अभिनेत्री येऊन गेल्या आहेत की, अनेकांना सुरुवातीला वाटत होते की, रणबीर आलियाला फसवेल तो तिच्याशी लग्न करणार नाही.

मात्र त्या दोघांचे आता लग्न झाले असले तरी, तो हे लग्न टिकवू शकेल की, नाही यावर अनेक जण प्रश्न विचारत आहेत. या सर्वांच्या प्रश्नांना आता रणबीरने असं काही उत्तर दिलं आहे की, या फ्लर्टीं बॉयला त्याच्या अफेअर बद्दल परत कुणीच काहीच विचारणार नाही.

मुलाखतीत तो म्हणाला की, ” मी माझ्या अनेक चित्रपटांत बोललो आहे की, लग्न म्हणजे रोजच डाळ भात खाल्या सारखं आहे, पण हे वाक्य मी परत घेतो कारण आयुष्यात एका स्टेजवर पोहचल्यानंतर समजतं की, नाही डाळ भातच बेस्ट आहे. आलिया माझ्या आयुष्यात डाळ भात, लोणचं आणि तडका हे सर्व काही आहे.”

त्याचं हे उत्तर ऐकून अनेक जणांना त्याचं कौतुक वाटतं आहे. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तसेच यामुळे सर्व जण आलियाला खूप नशीबवान समजत आहेत. रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये त्याची पत्नी आलिया आणि बिग बी देखील अभिनय करताना दिसणार आहेत.

रणबीर कपूरने आजवर अनेक हिट चित्रपट या बॉलिवूडला दिले आहेत. त्याचे अनेक चित्रपट हे तरुण पिढीला प्रेरणा देणारे आहेत तर काही चित्रपटांमध्ये एक वेगळाच लव अँगल दाखवण्यात आला आहे. संजय दत्त या अभिनेत्याच्या जीवनावर आधारित संजू या चित्रपटात रणबीरने हुबेहूब संजय दत्तची व्यक्तिरेखा आत्मसात केली होती.

या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. बर्फी या चित्रपटात त्याने बोलता न येणाऱ्या मुक्या बर्फीचे पात्र साकारले आहे. यामध्ये देखील त्याने अत्यंत दमदार अभिनय केला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *