प्रसाद ओकच्या शिरपेचात “दादासाहेब कोंडके स्मृती गौरव पुरस्कार”

मुंबई | धर्मवीर या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून खूप यश मिळवले. प्रत्येक ठाणेकरांनी आणि शिवसैनिकांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला. चित्रपटाची कथा ही शिवसेनेचे स्वर्गवासी नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने साकारली. त्याने आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय दिला. त्यामुळेच आता त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे.

नुकताच प्रसादला या चित्रपटासाठी उत्तम अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्याला “दादासाहेब कोंडके स्मृती गौरव सन्मान 2022” ने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच त्यांना सुंदर असं कॅप्शन देखील लिहिल आहे.

त्याने लिहिलं आहे की, “पहिला पुरस्कार धर्मवीर साठी” सांगताना अत्यंत आनंद होतोय कि आज #धर्मवीर साठी या वर्षीचा “दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान” मला मिळाला. हा सन्मान मा. आनंद दिघे साहेबांना समर्पित करतो. हि संधी मला दिल्याबद्दल दिग्दर्शक मित्र प्रवीण तरडे आणि निर्माते मित्र मंगेश देसाई यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर खा. मा. श्रीकांतजी शिंदे आणि मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेही मनःपूर्वक आभार..
या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल “महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास”, सौ माणिकताई व श्री पद्माकर मोरे आणि संतोष
परब या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे…!!! पुरुषोत्तम बेर्डे सरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला ह्याचाही आनंद आहेच…!!!”

चित्रपट सृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे शाहीर दादा कोंडके! यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ‘बस नाम ही काफी हैं या पंक्तीतील हे बांव… आपल्या विनोद बुध्दीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाचा, आपल्या निखळ, निरागस अभिनयानं सान्यांना आपलसं करणाऱ्या आणि मराठी व अमराठी रसिक मनावर अधिराज्य करणाऱ्या दादा कोंडके यांबी रंगमंच व चित्रपट सृष्टीत शाहीर, निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक, गीतकार या सर्वच आघाड्यांवर आपल्या कार्य कर्तृत्याचा ठसा खऱ्या अर्थाने उमटवला आहे.

अशात आता साल २०२२ चा पुरस्कार प्रसादला मिळाल्याने पुढे तो म्हणाला की, “लोकनेत्याच्या भूमिकेसाठी लोकशाहीराच्या नावाने सन्मानित व्हावं यासारखं भाग्य नाही…!!! श्री नटराज… शतशः प्रणाम…!!!” त्याची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *