रमया वस्तावया सारख्या १०० चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचे निधन; चित्रपट सृष्टीवर शोककळा

दिल्ली | रमया वस्तावया, लेके पहला पहला प्यार अशा सदाबहार गाण्याने बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे शिला वाझ. त्यांनी १९५० च्या दशकात आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घातली. मात्र आता त्या या जगात नाहीत. २९ जून रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने आता अनेक कलाकार आणि चाहते भावूक झाले आहेत.

 

शीला वाझ यांचा एक नृत्यांगना म्हणून बॉलिवूडवर चांगलाच दबदबा होता. मात्र सुरुवातीस त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी नकार दिला होता. शीला या कॅथलिक कुटुंबातील आहेत. इथेच त्याचं संगोपन झालं. अशात हिंदी भाषिक लोकगीते साकारताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. संघर्षाला तशी घरातूनच सुरुवात झाली होती. मात्र त्यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्यामुळेच आज त्या जरी या भूमीवर नसल्या तरी देखील त्यांच्या गाण्यांनी त्या अजरामर झाल्या आहेत.

 

१९५४ साली मयूरपंख हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी प्रथम नृत्य केले. राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ चित्रपटात त्यांनी ‘रमया वस्तावया’ या गाण्यात आपल्या नृत्याची मोठी जादू दाखवली. या गाण्याचे दिग्दर्शन मास्टर सत्यनारायण यांनी केले होते. त्यानंतर शीला यांनी ‘लेके पहला पहला प्यार’ या गाण्यावर देखील नृत्य केले. वरळी सी फेस भागात एका दिवसात या गीताचे शुटींग झाले होते.

 

‘मि. अॅण्ड मिसेस ५५’ चित्रपटातील ‘थंडी हवा, काली घटा’ तर १९५७ मधील ‘तुमसा नहीं देखा’ चित्रपटातल्या ‘छुपनेवाले सामने आ’ आणि ‘हाऊस नंबर ४४’ या चित्रपटातील ‘दिन है बागी तो घर नहीं’ आणि १९६१ मध्ये ‘छोटा नवाब’ या चित्रपटामधील ‘घर आजा घर आया’ या गाण्यात शीला यांनी धमाकेदार नृत्य केलं होतं.

 

जॉनी वॉकर, एक साल, मिस्टर एक्स, सोलवां साल , दुर्गेश नंदिनी, गेस्ट हाऊस, कागज के फूल, बस कंडकटर, बहाना, रामलीला, बटवारा, माॅडर्न गर्ल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटातील त्यांची गाणी आजही युट्युब वरील शिमारू या चॅनलवर दिसतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *