आणखीन एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली विधवा; ४८व्या वर्षी पतीने घेतला जगाचा निरोप

दिल्ली | तमिळ अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांचे मंगळवारी चेन्नई येथे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. पतीच्या निधनाने मीना पूर्णतः खचून गेल्या आहेत. त्यांचे पती विद्यासागर यांना मार्च 2022 मध्ये कोविड-19 ची लागण झाली यावर त्यांनी उपचार घेतले आणि ते बरे देखील झाले. मात्र, यानंतर लगेचच त्यांना फुफ्फुसाचा एक आजार झाला. त्यामुळे बराच काळ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांची प्रकृती अधिक खालावली.

विद्यासागर हे एक व्यापारी होते. साल 2009 मध्ये मीना यांच्याशी त्यांनी लग्न केले. त्यांची 11 वर्षांची मुलगी आहे. नैनिका असं तिचं नाव असून तिने देखील बाल कलाकाराच्या भूमिकेत काम केले आहे. तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिने विजय-स्टारर ‘थेरी’ मधील बाल कलाकार म्हणून काम केलं आहे.

मीना यांनी 1982 मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ अनेक सुपरस्टार चित्रपटांत काम केले आहे. तसेच फक्त तमिळ नाही तर मल्याळम, तेलगू, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. नुकत्याच त्या मोहनलालच्या मल्याळम हिट ‘दृश्यम 2’ मध्ये दिसल्या होत्या.

अशात आता मनोरंजन विश्वातील अनेक व्यक्ती आणि चाहते त्यांच्या दुःखात शामील झाले आहेत. अशात २९ जून रोजी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या निधनाने सोशल मीडियावर आता वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यांच्या मृत्यूची वेगवेगळी कारण समोर येत आहे.

त्यामुळे या सर्वांवर मीना यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे की, ” माझे प्रिय पती विद्या सागर यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी सर्व माध्यमांना प्रामाणिकपणे विनंती करते की त्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आमच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती दाखवावी. कृपया या प्रकरणावरील कोणत्याही चुकीच्या माहितीचे पुढील प्रसारण थांबवा.”

तसेच पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ” या कठीण काळात, ज्यांनी आमच्या कुटुंबाला मदत केली आणि आमच्या पाठीशी उभे राहिले त्या सर्व व्यक्तींसाठी मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते. मी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे, आमचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, राधाकृष्णन IAS, सहकारी, मित्र, कुटुंब, मीडिया आणि प्रेम आणि प्रार्थना पाठवल्याबद्दल माझे प्रेमळ चाहते यांचे आभार मानू इच्छिते.” पतीच्या निधनाने अद्यापही त्या दुःखातून बाहेर आलेल्या नाहीत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *