निःशब्द! दोन मुलांच्या निधनानंतर नातीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजोबांची धरपड; रिक्षा चालवून…

मुंबई | काही व्यक्तींच्या आयुष्यात कल्पनेच्या पलीकडचे दुःख येऊन कोसळतात. मात्र या दुःखामधून सावरत अनेक व्यक्ती धडाडीने मोठ मोठ्या संकटांवर देखील मात करतात. एका वडिलांना आपली मुले तरुण असताना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्याचा काळात त्यांच्या चितेला अग्नी द्यावी लागली. यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतच नाही. मात्र या आजोबांनी मोठ्या हिमतीने स्वतःला सावरले.

त्यांच्या यशाची कहाणी एकूण तुमचे डोळे पानातील. कारण त्यांनी आपल्या नातवंडांसाठी घेतलेली मेहनत ही खूप मोठी आहे. ऐन उमेदीत त्यांच्या दोन्ही मुलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा भार त्यांनी आपल्या खांद्यांवर घेतला. हा भार ते अगदी मरेपर्यंत पेलवणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या आजोबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आजोबांची कहाणी सांगितली गेली आहे. अनेक जण हा व्हिडिओ पाहून ढसाढसा रडत आहेत. चला तर मग या आजोबांची संघर्षमय कहानी नेमकी आहे तरी कशी हे जाणून घेऊ.

सहा वर्षांपूर्वी या आजोबांचा मोठा मुलगा हे जग सोडून गेला. त्याचे शव त्यांना त्याच्याच रिक्षात सापडले. वयाच्या 40 व्या वर्षी मुलाचे निधन झाल्याने आजोबा पूर्णता खचून गेले होते. मात्र त्यांनी हिम्मत हारली नव्हती. मुलाचे ज्या रिक्षात निधन झाले तोच रिक्षा चालवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

मोठ्या मुलाचे निधन झाल्यानंतर या धक्क्यातून ते सावरत नाहीत तोच त्यांच्या धाकट्या मुलाचे देखील निधन झाले. मोठ्या मुलाच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांचा लहान मुलगा देखील हे जग सोडून निघून गेला. यावेळी काही कारणास्तव त्यांच्या धाकट्या मुलाने आत्महत्या केली होती.

एवढ्या तरुण वयात दोन्ही मुलांनी स्वतःचे जीवन संपवले यामुळे हे आजोबा खूप दुःखी होते. त्यांच्यावर त्यांच्या दोन्ही सूनांची आणि नातवंडांची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच आपल्या कुटुंबाच्या सेवेसाठी रिक्षा चालवायला सुरुवात केली.

गरीबी जास्त असल्याने त्यांच्या नातीने शिक्षण सोडून देण्याचा निर्णय घेतला. मात्र आजोबांनी तिला खूप समजावले. तसेच तिच्या शिक्षणासाठी संपूर्ण जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले. नातीच्या मनामध्ये देखील शिकून एक मोठी शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे तिने देखील पुढील शिक्षण सुरू ठेवण्यास होकार दिला.

आजोबा रात्रंदिवस रिक्षा चालवून आपलं कुटुंब चालवत होते. त्याचबरोबर ते आपल्या नातीच्या शिक्षणासाठी पैसा जमा करत होते. अजून देखील ते आपल्या नातीच्या शिक्षणासाठी पैसे जमा करत आहेत. आजोबा घेत असलेले अपार कष्ट लक्षात घेता त्यांची नात बारावीच्या परीक्षेत मेरिटमध्ये आली. यामुळे त्या आजोबांना गगनात मावेना एवढा आनंद झाला.

दोन्ही मुलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच हा आनंदाचा क्षण त्यांच्या नातीने आणला होता. त्यामुळे बाबांचे मन गहीवरून आले होते. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण दिवसभर प्रवाशांना फ्री मध्ये त्यांच्या ठिकाणी सोडले. तसेच प्रत्येक व्यक्तीला माझी नात मेरिटमध्ये आली आहे असे देखील सांगितले.

या आजोबांचा हा संघर्ष अजूनही संपलेला नाही. रिक्षा चालवून त्यांना महिन्याला दहा हजार रुपये मिळतात. यातील सहा हजार रुपये नातीच्या शिक्षणासाठी खर्च होतात. उरलेल्या चार हजारांमध्ये ते आपले घर चालवतात. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नातीला पुढील शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी आपले मुंबईतले घर देखील विकले.

तसेच संपूर्ण कुटुंबाला गावी पाठवले. आता आपल्या नातीच्या मनात शिक्षक होण्याची जी जिद्द आहे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी हे आजोबा आपार कष्ट घेत आहेत. ते रिक्षामध्येच जेवतात आणि रिक्षामध्येच झोपतात. संपूर्ण दिवसभर रिक्षा चालवून शिक्षणासाठी पैसे गोळा करतात.

त्यांच्या या संघर्षात त्यांची नात त्यांचं नाव आणखीन उज्वल करेल यात तीळ मात्र शंका नाही. आजोबांच्या या धाडसी वृत्तीचे अनेक जण कौतुक करत आहेत. त्यांचा हा संघर्ष पाहून अनेक तरुण मुलांना आणि मुलींना आपल्या आयुष्यात धडाडीची कामे करण्यासाठी उमेद मिळेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *