फोटोत दिसत असलेली ही चिमुकली सिनेसृष्टीवर करते राज्य! ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री…

मुंबई | प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराविषयी सर्व माहिती जाणून घेणे खूप आवडते. यासाठी चाहते खूप धडपड करत असतात. आपला आवडता कलाकार खासगी आयुष्यात काय करतो. त्याचे आई वडील संपत्ती बालपण या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. अशाच सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटीशी मुलगी तिच्या वडिलांच्या मांडीवर बसलेली आहे. सुंदर फ्रॉक, केसांच्या शेंड्या, कपाळावर टिकली आणि ओठांवर गोड हास्य असलेली ही चिमुकली आता मराठी सिनेसृष्टीची एक मोठी अभिनेत्री झालेली आहे. फोटो पाहून तुम्हाला ती अभिनेत्री नेमकी कोण आहे हे समजतंय का जरा पहा.

सोशल मीडियावर तिचा हा फोटो खूप व्हायरल होतोय. पण अनेकांना ही नेमकी कोण आहे हे ओळखता येत नाहीये. मराठी सिनेसृष्टीच्या अनेक चाहत्यांसमोर आता हे मोठे चॅलेंज उभे राहिले आहे. मात्र आम्ही या फोटोचा शोध घेतला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला ही चिमुकली नेमकी कोणती अभिनेत्री आहे हे सांगणार आहोत.

तर फोटोमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी वाय या चित्रपटातील रणरागिणी आहे. होय तुम्ही बरोबर ओळखताय ही मुक्ता बर्वेच आहे. मुक्ताचा हा लहानपणीचा फोटो आहे. तसेच हा फोटो तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. मुक्ताचा सोशल मीडिया अकाउंट चालल्यावर आम्हाला तिथे हा फोटो मिळाला.

बालपणीच्या आठवणी ताज्या करत मुक्ताने चाहत्यांसाठी हा फोटो शेअर केला होता. मुक्ताने मराठी सिनेसृष्टी आजवर मोठं नाव कमावलं आहे. नुकताच तिचा वाय हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील तिची स्वतंत्र स्त्रीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. अशा तिने आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिलेत. जोगवा हा त्यातीलच एक चित्रपट आहे.

जात, रूढी, परंपरा या सर्वांवर भाष्य करणारा तिचा जोगवा हा चित्रपट देखील खूप गाजला होता. या चित्रपटात तिने काही अल्टिमेट सीन देखील दिले होते. अशा सीन मुळे बऱ्याच अभिनेत्री आजवर ट्रोल झाल्या आहेत.

मात्र मुक्ताने यामध्ये केलेला अभिनय खरोखरच कौतुकास्पद होता. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला नाही. अशाच आता तिचा लहानपणीचा फोटो पाहून अनेक चाहते तिला वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तसेच यावर हार्ट इमोजीचा आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *