चालू राजकारणावर आधारित असलेला ‘मी पुन्हा येईल’ चा टीझर रिलीज

मुंबई | सत्तेच रक्त जिभेवर लागलं की, ते लवकर सुटत नाही. मग ते मिळवण्यासाठी जुगार आणि वेगवेगळ्या नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्ती काहीही त्यांना हवं ते मिळवण्यासाठी काहीही करू शकतात तसचं काहीस राजकारण्यांच आहे. अशात सध्या राजकारणात चांगलीच राजकीय खलबत कुटली जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच आपण महाराष्ट्राच्या राजकारणात रिसॉर्ट पॅटर्नचा अनुभव घेतला. फोडा आणि राज्य करा अशी मोहीम इथे राबवण्यात आली. नेमका कौल कुणाच्या बाजूने लागेल याची कुणालाच शेवटपर्यंत कानोकान खबर नव्हती. त्यात शेवटी शिंदे गटाची बाजी की मजबुरी असा प्रश्न अजूनही अनेकजण विचारत आहेत. अशात आता याच सत्य घटनेवर आधारित प्लॅनेट मराठी एक नवीन वेब सिरीज घेऊन येत आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात या सिरीज बद्दल म्हणतात की, “सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, चित्रपटात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल”

या सिरीजमध्ये राजकारण, आमदार पळवणे, रिसॉर्ट पॅटर्न, लपंडाव हा सर्वच प्रकार दाखवला जाणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्ष एवढा पिसाळला आहे की, त्याने सत्ता धर्यांना त्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवून हाणून पाडल आहे. अशात आता याच परिस्थितीवर आधारित “मी पुन्हा येईल” या शीर्षकाची वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकताच तचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून नेमकी काय आणि कशी पळवा पळवी झाली हे लक्षात येईल. यामध्ये भारत गणेशपुरे, सायली शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी, संजय कुलकर्णी, राजेंद्र गुप्ता हे कलाकार वेगवेगळ्या राजकीय नेत्याचा मुखवटा लावणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *