लग्न म्हणजे संस्कार की बंधन?

मुंबई | लग्न समारंभ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येत असतो. या दिवशी सर्व जण खुश असतात. लग्न म्हटल्यावर अगदी साखरपुड्यापासून खरेदीला सुरुवात होते. अशात सध्यातर बॉलिवूडच्या लग्नांप्रमाणे लूक आणि थाट करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा या अभिनेत्रीं सारखे लूक अनेक मुली आपल्या लग्नात करताना दिसतात.

लग्न म्हणजे दोन जीवांचा संगम असं म्हणतात. पत्रिकेतील सर्व गुण जुळले तरच लग्न जमत. अशात अनेक मुलं मुली लव मॅरेज देखील करतात. मुलगा आणि मुलगी दोघेही एक मेकांना पसंत करत असतात. त्यांना एकमेकांच्या चांगल्या वाईट दोन्ही सवई माहीत असतात.

मग तरी देखील जेव्हा हे दोघेही घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगतात तेव्हा त्यांच्या पत्रिका आणि त्यातले गुण जुळत नाही. अशा बऱ्याच घटना तुम्ही आजवर तुमच्या आजूबाजूला पाहिल्या असतील.

अनेक ठिकाणी आजही लग्नातील सर्व खर्च मुलीच्या घरची मंडळी करतात. खरतर लग्न हे फक्त ती मुलगीच करत नाही तर मुलगा देखील करत असतो. त्यामुळे लग्नाचा खर्च हा दोन्ही व्यक्तींनी समान देणं आवश्यक आहे नाही का?

लग्न झाल्यावर मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलतं. अगदी कपाळापासून ते पाया पर्यंत सगळीकडे मुलीला मुलाच्या नावाचे अलंकार घातले जातात. त्याच्या नावाचं कुंकू, हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी अशा सर्व अलंकारांनी नवरीला सजवलं जातं.

तसं पाहायला गेलं तर हे सर्व खूप छान वाटत. पण हे एक बंधन नाही का? या सर्वात सर्वच दागिने पतीच्या नावाचे घातले जातात. यामध्ये अजून एकही असा दागिना बनलेला नाही जो पतीला पत्नीच्या नावाने घालणे बंधनकारक आहे.

प्रत्येक वडील त्यांच्या मुलीला शिकवून चांगल आयुष्य देतात. अशात ज्या आई वडिलांना एकच मुलगी असते अशा अनेक मुलीचं हे स्वप्न असतं की, आपण मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांना सांभाळू. त्यासाठी आपली म्हातारपणाची काठी बनणाऱ्या मुलीला आई वडील खूप शिकवतात.

मग एक दिवस या मुलीचं लग्न होतं. आई वडील मोठ्या थाटात मुलीचं लग्न लावतात. मुलगी नोकरी देखील करत असते. त्यामुळे ती तिच्या आई वडिलांना देखील पैसे पाठवते. पण हे पैसे देताना बऱ्याचदा काही मुलींना सासरच्या मंडळींकडून वाईट वागणूक दिली जाते. लग्न व्यवस्था वाईट आहे असं नाही. मात्र संस्कार आणि त्याच्या नावाखाली मुलींच्या पायात घातलेली बंधने मात्र चुकीची आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *