दिपा आणि कार्तिक येणार एकत्र? कार्तिकीची हाक ऐकणार का विठ्ठल, पाहा नवीन ट्विस्ट

मुंबई | संघर्ष आणि मेहनत या दोन्ही गोष्टी कायमच दीपाच्या समोर उभ्या आहेत. रंग माझा वेगळा या मालिकेत दिपाला आजवर अंधारात ठेवण्यात आलं. तिच्या बाळांची अदलाबदल करून आजूनही तिच्या जवळ तिच्या दोन मुली नाहीत. हा सर्व प्रकार तिची सासू म्हणजेच सौंदर्य मॅडमने केला. मात्र आता ती तिची मुलगी दीपिकाला मिळवण्यासाठी मोठी धडपड करते आहे.

दीपिका आणि कार्तिकी या दोन्ही कार्तिक आणि दिपाच्या मुली आहेत. कार्तिक बरोबर वाद झाल्याने डिलिव्हरीवेळी दिपा एकटी होती. तिला दोन जुळ्या मुली झाल्या. त्यावेळी सौंदर्या तिथे आली होती. तिला वाटले की, दिपा दोन्ही मुलींना नीट सांभाळू शकणार नाही. त्यामुळे तिने एका मुलीला तिथून नेल. अशात आजवर दीपिका सौंदर्याकडे राहत आहे. तसेच कार्तिकी दिपाकडे रहात आहेत.

ज्यावेळी हा प्रकार घडला तेव्हा दिपा बेशुद्ध होती. तिला शुद्ध आल्यावर डॉक्टरांनी तिला सांगितलं की, तुला दुसरा मुलगा झाला होता. मात्र तो जन्मतः मृत होता. यावर दिपा तिथून कर्तिकीला घेऊन निघून जाते. अशात गेल्या अनेक दिवसांपासून कार्तिक आणि दिपा दोघेही वेगळे राहत आहेत. दिपा मेहनतीने तिचे आणि कर्तिकीचे पालनपोषण करते आहे. अशात नुकतेच तिला तिच्या मुलींबद्दल सत्य समजले आहे.

त्यामुळे ती सौंदर्या पासून आपले नाते तोडून टाकते. तसेच कार्तिकला भेटते आणि त्याला देखील ही सर्व घटना सांगते. मात्र कार्तिक यावर विश्वास ठेवत नाही. अशात आता हे दोघे पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढताना दिसत आहेत. दोघांनी वकिलांशी बोलण केलं आहे. यावर वकील त्या दोघांना म्युचल सेटलमेंटचा सल्ला देतात. मात्र कार्तिक म्हणतो की, मला काहीच म्युचल सेटलमेंट करायची नाही आणि मी माझ्या मुलीला देखील तिच्या ताब्यात देणार नाही.

दिपा एव्हढे दिवस दोन मुली असून देखील एकाच मुलीचा सांभाळ करत आली आहे. आता तिला तिची दुसरी मुलगी देखील पाहिजे आहे. या सर्व गोष्टी आता कार्तिकीला देखील माहीत झाल्या आहेत. त्यामुळे कार्तिकीला देखील तिची बहीण पाहिजे. मात्र तिला फक्त बहीण नको तर बाबा देखील पाहिजे आहेतं. माझे बाबा आणि दीपिका दोघेही परत येऊद्या अस साकड ती विठ्ठलाला घालताना दिसत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *