मराठमोळी अभिनेत्री अनिता दातेचां ‘तो’ फोटो व्हायरल; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनिता दातेचा एक हार घातलेला फोटो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो समोर आल्यावर चाहत्यांमध्ये हे झालं कसं अशी एकच खळबळ उडाली होती. अनिता दाते हिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत दमदार अभिनय केला आहे.

या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. अशात ता तिचा व्हायरल होत असलेला फोटो पाहून चाहते खूप चिंतेत होते. मात्र आता या फोटोचे सत्य समोर आले आहे. अभिनेत्रीचा हा हार घातलेला फोटो तिच्या खऱ्या आयुष्यातील नसून एका आगामी मालिकेतील आहे.

झी मराठी या वाहिनीवर लवकरच नवा गाडी नवा राज्य ही मलिका सुरू होणार आहे. या मालिकेत अनिता मृत दाखवली आहे. याच मालिकेतील तिचा हा फोटो आहे. सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

या मालिकेत देखील अनिताची सवत पाहायला मिळणार आहे. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक आता खूप उत्सुक आहेत. अनिताने या आधी साकारलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको यामध्ये देखील तिची सवत शनाया दाखवली गेली होती. अशात आता या मालिकेत देखील तिला सवत आहे.

नवा गडी नवा राज्य या मालिकेत अनिता रमा हे पात्र साकारणार आहे. पल्लवी पाटील ही अभिनेत्री आनंदी हे पात्र साकारणार आहेत. आनंदी ही रमाची सवत असणार आहे. तसेच या दोघींच्या पतीचे पात्र अभिनेता कश्यप पुरुळेकर साकारणार आहे आणि वर्षा दंदाळे या सासूच्या भूमिकेत दिसतील. मालिकेत रमा ही कश्यपची पहिली पत्नी असते. जिचा मृत्यू झालेला आहे.

त्या घरात तिचा एक मोठा फोटो लावण्यात आला आहे. मृत्यू झाला असला तरी तिचा आत्मा त्या फोटोमध्येच असल्याचे दिसते. प्रोमोमध्ये दाखवले आहे की, कश्यपचे दुसरे लग्न आनंदी बरोबर होते. त्यामुळे रमा सतत आनंदी बरोबर फोटोमधून संवाद साधते. हे माझं घर आहे असं ती नेहमी बोलत असते. अशात आनंदी पुढे त्या घरात स्वतः ची ओळख निर्माण करण्याचं एक वेगळं आवाहन आहे.

या मालिकेमध्ये विशेष म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेतील एक बाल कलाकार देखील आहे. साईशा भोईर ही बाल कलाकार रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकी हे पात्र साकारत होती. काही दिवसांपूर्वीच तिने ही मालिका सोडली. अशात आता सईशा नवा गडी नवा राज्य या मालिकेत अभिनय करताना दिसणार आहे. साईश ही रमाची मुलगी आहे. त्यामुळे आनंदी पुढे तिचे मन जिंकण्याचे देखील मोठे आवाहन असणार आहे. या मालिकेचे निर्माते गौरव घटनेकर आणि श्रुती मराठे आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *