मंगेश देसाई यांनी वाचवले रंगभूमी कलाकाराच्या मुलाचे प्राण; मुख्यमंत्र्यांनी केली मदत

मुंबई | प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात आपल्या पेक्षा गरीब आणि गरजू व्यक्तींना मदत केली पाहिजे. मात्र ही मदत निस्वार्थी असणे अत्यंत गरजेचे आहे. याचीच प्रचिती धर्मवीर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी घडवून दिली.

मंगेश देसाई यांनी एका गरजू रंगभूषा कलाकार असलेल्या व्यक्तीच्या मुलाचा मोफत उपचार करून दिला आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत. रंगभूषा कलाकार हा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आपल्या मुलाला झालेल्या आजाराचे योग्य निदान करू शकत नव्हता. यावेळी त्याला एक मदतीचा हात हवा होता. हाच मादीचा दुवा बनण्याचे काम मंगेश देसाई यांनी केले आहे.

रंगभूषा कलाकाराचे नाव विजय हर्णे असे आहे. विजय यांचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून एका आजाराशी झुंज देत होता. त्याला उपचारासाठी जास्त पैशांची गरज होती. मात्र पुरेसे पैसे नसल्याने त्या मुलाचे उपचार थांबले होते. अशात त्याचे वडील म्हणजे विजय हे सर्वत्र आपल्या मुलाच्या उपचारासाठी मदत शोधत होते. यावेळी त्यांनी दिग्दर्शक अमोल भावे यांच्याशी देखील संपर्क केला. अमोल त्यांनी विजय यांना मंगेश देसाई यांच्याशी संपर्क करून दिला.

मंगेश देसाई यांना सादर बाब कळताच त्यांनी तात्काळ त्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तसेच त्या मुलावर सर्व उपचार झाल्यानंतर त्याला घरी सोडत असताना मंगेश यांनी त्याचे रुग्णालयातील बिल देखील भरले. हा मदतीचा हात पाहून विजय यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी लगेचच कौतुकाच्या शब्दात विजय यांचे आभार मानायला सुरुवात केली.

त्यावेळी ते म्हणले की, ” तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला यासाठी मी तुमचा कायमच ऋणी राहील.” तेव्हा मंगेश यांनी एक खुलासा करत सांगितले की, ” यामध्ये मी फक्त एक निमित्त मात्र होतो. ही मदत महाराष्ट्राचे मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार माना.” मुख्यमंत्री निधीतून आपल्या मुलाचे प्राण वाचले आहेत हे समजल्यावर विजय यांनी त्यांचे देखील आभार मानले. तसेच विजय म्हणाले की, ” मी मुख्यमत्र्यांनी केलेली ही मदत कधीच विसरणार नाही. ”

राजकीय वर्तुळातून असे अनेक निधी आहेत जे गरजु व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत. मात्र अनेक सामान्य व्यक्तींना त्याची माहिती नाही. अशात मंगेश देसाई यांनी हीच माहिती विजय त्यांच्या पर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ देखील मिळवून दिला आहे. महाराष्ट्राला अशाच होतकरू व्यक्तींची खूप गरज आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *