मन उडू उडू झालं मालिकेच्या चाहत्यांसाठी दुःखत माहिती; ‘या’ दिग्गज कलाकाराने सोडली मालिका?

मुंबई | मालिकेतील अनेक कलाकार हे आता मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात अनेक कलाकार यासाठी आपल्या मालिकेतून ब्रेक घेत आहे. मन उडू उडू झालं ही मकीला देखील आता उत्कठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे. अशात मालिकेतील इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत हा बेंगलोरमध्ये पोहचला आहे.

त्याचे बेंगलोरमधील फोटो पाहून आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. अनेक जण अस म्हणत आहेत की, त्याने मालिका सोडली की काय? मात्र तसे काही नाही. कारण या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, “मी लवकरच एका नवीन भूमिकेत दिसणार आहे.” यासाठीच तो बेंगलोरला एका ठिकाणी गेला आहे. इथे त्याच्या आगामी प्रोजेक्टच शुटींग सुरू आहे. हा फोटो पाहून तो नक्कीच आता मोठ्या पडद्यावर झळकेल असं म्हटलं जातं आहे.

अजिंक्यने मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्रा या पत्राला पूर्णपणे न्याय दिला आहे. त्याची भूमिका फक्त युवकांना नाही तर अगदी वृध्द व्यक्तींना देखील खूप आवडते. कमी कालावधीत त्याने यशाचं शिखर गाठलं आहे. त्याच्या दमदार अभिनयाने त्याला वेगवेगळ्या ऑफर येत आहेत. अशात आता तो लवकरच आपल्याला नवीन भूकेत पाहायला मिळेल.

सोशल मीडियावर त्याचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. अनेक जण त्याला त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल प्रश्न विचारत आहेत. मात्र अजूनही त्याने यावर अधिक माहिती दिलेली नाही. मालिकेत त्याची आणि दिपुची जोडी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करते. मालिकेत आता त्याचे सत्य सर्वांना समजले आहे.

त्यामुळे दीपूच्या घरचे त्याच्या नात्याला परवानगी देत नाहीत. मात्र तरी देखील दिपू घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अजिंक्यने या मालिकेतून आता काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तो आपल्याला मालिकेत कमी दिसेल, अथवा दिसणार नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *