मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? त्याही आहेत एक उत्तम अभिनेत्री….

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आजवर अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. गाढवाच लग्न हा चित्रपट त्यांचा खूप गाजला होता. त्यांची डायलॉग बोलण्याची गावाकडील शैली इतर विनोदी अभिनेत्यांपेक्षा अनोखी आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्यावर आणि त्यांच्या अभिनयावर खूप प्रेम करतात.

मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले.

चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, दे धक्का असे अनेक चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवले आहेत. अशात लवकरच ते दे धक्काचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयाबरोबरच ते समाज कार्यात देखील सक्रिय आहेत.

मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.

अशात एवढ्या मोठ्या विनोदी अभिनेत्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे यांनी देखील काही चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.

मकरंद आणि शिल्पा यांचा विवाह साल २००१ मध्ये झाला. या दोघांचं लवमॅरेज आहे. “जाऊबाई जोरात” मध्ये काम करत असताना या दोघांची भेट झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्री प्रेमात बदलली. त्यामुळे पुढे त्यांनी विवाह केला.

शिल्पा यांना देखील आधीपासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं आहे. मात्र आता त्या अभिनयात सक्रिय नाही. लग्नानंतर त्यांनी फक्त मकरंद यांच्या बरोबरच काम केले आहे.

यामध्ये साल २००९ साली आलेला चित्रपट गोष्ट छोटी डोंगराएवढी’ साल २०१० मधील ‘सुंबरान’, ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’, ‘गड्या आपलं गाव बरं’, ‘कापुस कोंड्याची गोष्ट’ अशा काही मोजक्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *