पर्यटक प्रेमी असाल तर ‘या’ लेण्या आणि त्यांचा इतिहास नक्की वाचा…

दिल्ली |जर तुम्ही पर्यटन प्रेमी असला तर तुम्हाला विविध गड किल्ले फिरण्यासह लेण्यांना भेट द्यायला देखील नक्की आवडत असेल. तर आज या बातमीतून काही लेण्या आणि त्यांच्याविषयी माहिती घेऊ….

गांधारपाले लेणी
गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे.

ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाड जवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहेत. यांचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. ही लेणी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर महाडच्या उत्तरेस ३ किमी अंतररावर असलेल्या डोंगरात कोरलेली आहेत.

हा एकूण ३० लेण्यांचा समुह असुन ३ चैत्यगृह व १९ विहार आहेत. लेणे क्र.१ मधे ५३ फुट लांब व ८ फुट रुंद ओसरी आहे. गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मुर्ती व धम्मचक्र कोरलेली आहेत. लेणे क्र.२१ में गौतम बुद्ध यांची बसलेली मुर्ती,त्यांचे शिष्य व हरिणाची चित्र कोरली आहेत. येथिल शिलालेखा नुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णू पुलित यांच्या कारकीर्दित ई.स. १३० च्या आसपास निर्माण केली गेली.

येथील शिलालेखा नुसार ई.स. बौद्ध संघाला सावकारांकडुन देणगी व जमिनी मिळाल्याची नोंद आहे. ऐतिहासिक व पर्यटन या दोन्हि दृष्टिने ही लेणी महत्त्वपूर्ण आहेत. राजा पुलित याच्या नावावरून पाले हे गावाचे नाव रुढ झाले. गांधारपाले हे महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर (NH 17) महाड शहरा लगत आहे.मुंबई पासुन अंतर १७५ कि.मी. डोंगरावर कोरलेली ही लेणी महामार्गाला लागुनच असुन वर जायला पायरी मार्ग आहे.

ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहे. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत. पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी सुमारे २०-२५ मिनीटे लागतात.

औरंगाबाद लेणी
औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे शतक यादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली आहे.

यात लेण्यांची संख्या १२ इतकी आहे. तुलनेने मृदू अशा बेसॉल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहे आणि त्याच्या स्थानावरून ही सर्व १२ लेणी मुख्यत्वे तीन गटांत विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेणींचा संबंध लावला जातो. अजिंठ्याची लेणी आणि वेरूळची लेणी ही युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थाने म्हणून घोषित झाली आहेत.

यातील लेणे क्रमांक ३ हे अजिंठ्याच्या महायान लेण्यांच्या शैलीतील आहे. लेणे क्रमांक ७ हे मात्र वेरूळच्या रामेश्वर लेण्याशी (लेणे क्रमांक २४) मिळतेजुळते आहे. त्यात पुढे व्हरांडा असून मागील भिंतीत गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत भिक्खूंच्या खोल्या आहेत.

ही बुद्ध लेणी भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना दर्शवितात. सहाव्या आणि आठव्या शतकाचा विचार करता औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहराच्या मध्यभागापासून नऊ किमी तर सध्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बीबी का मकबरा परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर आहेत.

त्यांतील शिल्पे अजिंठा आणि वेरूळ लेणी यांच्याया तुलनेत खूपच लहान, अधिक जीर्ण आणि कमी भेट दिली गेलेली आहेत. ही लेणी बघायला सुरुवात केली असता असे लक्षात येते की, “वेळ आणि स्थळ आणि काळ यात वसलेले हे संवेदनशील जीवन होय”. ही लेणी ही हे भारतीय पुरातत्त्व खात्याने मान्ता दिलेले संरक्षित स्मारक आहे.

वेरूळची लेणी
ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध (लेणे क्र. १ – १२), १७ हिंदू (लेणे क्र. १३ – २९) आणि ५ जैन (लेणे क्र. ३० – ३४) लेणी आहेत.

इ.स. १९५१ साली भारत सरकारने या लेण्याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. १९८३ मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे, राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (757-783) मध्ये बांधण्यात आले होते. हे एलोरा(वेरुळ) जिल्हा औरंगाबाद येथे स्थित आहे.

संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे, ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद, हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे 40 हजार टन दगड काढला गेला. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले.

मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पुल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमूना आहे.१९व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते.

आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९६० च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *