प्रेम मनातली एक भीती आणि समाजाचे टोमणे

विशेष मराठी | प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत असं म्हणतात. पण याच प्रेमाचे विवध रंग आहेत. प्रत्येकाची आपलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. मुळात प्रत्येक जण आपल्या सोई नुसार प्रेमाची व्याख्या ठरवत असतो.

मग आता प्रेम विषय आहे तर कॉलेज येणारच. कारण प्रेमाच्या खोडाला कॉलेजमध्येच पालवी फुटत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एकदा तरी प्रेम करतोच मग यामध्ये काही काही व्यक्ती आपल्या प्रेमासाठी अगदी काहीही करण्यासाठी तयार असतात.

प्रेमात जीव दिलेल्या अनेक तरुणांच्या कथा आजही अमर आहेत. १९८१ आली एक दुजे के लिये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेच डोंगरावर आणि तेथील झाडा झुडपावर आपलं आणि आपल्या प्रेयसीचं नाव लिहिण्याची प्रथा सुरू केली.

तसेच या काळात ज्यांच्या ज्यांच्या प्रेमाला विरोध झाला त्यात्या जोडप्यांनी डोंगर दऱ्यायावरून उदी घेत आत्महत्या केली. असाच एक चित्रपट सध्याच्या काळात देखील प्रदर्शित झाला ज्याचं नाव आहे सैराट. या चित्रपटाने देखील इतिहास घडवला. १०० कोटींहून अधिकची कमाई करणारा हा मराठीतला पहिलाच चित्रपट ठरला.

या चित्रपटानंतर देखील अनेक प्रेमी युबलक पळून गेले. बऱ्याच ठिकाणी त्यांना शोधून दोघांचाही खून करण्याच्या घटना वास्तवात देखील घडल्या. प्रेम कहाणीला जास्त बाळ मिळते ते चित्रपट आणि गाण्यांमुळे असं म्हणत अनेक जण या सर्व घटनांसाठी चित्रपटांना दोशी ठरवतात. पण हा तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण चित्रपट हे मनोरंजनाचं एक माध्यम आहे. त्यामुळे त्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

याचं प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. एका आईचं तिच्या बाळावर असलेलं प्रेम, बहिणीची भावासाठी असलेली माया या देखील प्रेमातच मोडतात. अशात शाळेत आणि महाविद्यालयात अनेक तरुण मुलं मुली प्रेमात पडतात. घरी या गोष्टी समजल्यावर त्या मुलांना मारहाण केली जाते.

बऱ्याच सर्व सामान्य कुटुंबात मुलाचं अस काही घरी समजल की, सगळे जण त्याची मस्करी करतात आणि हस्ल्यावरी हे प्रकरण मिटवतात. मात्र त्याच घरात जेव्हा मुली विषयी असं काही समजतं तेव्हा मात्र चित्र वेगळं असतं. त्या मुलीला कोणीच समजून घेत नाही.

घराण्याची इज्जत घालवली असं म्हणत त्या मुलीचं शिक्षण थांबल जातं आणि घाईने लग्न देखील उरकलं जातं. पुढे मुलगी आपल्या संसाराचा भार झेलत असते. मूल सासू सासरे यांमध्ये तिचं आख्ख आयुष्य जातं. यात ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही. परिणामी ती कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. हे असं अनेक घरामध्ये होतं असतं.

मात्र त्या मुलीला मारहाण करण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक आई वडिलांनी त्या मुलीला समजून घेणं गरजेचं असतं. कारण ती जे वागते यात तिचा काहीच दोष नसतो. दोष असतो तो तिच्या वयाचा. ते वयच असं असतं ज्यात त्या मुलीला फक्त तो मुलगा बरोबर आहे. मैं उसके बिना जी नही सकती, मैं मर जाऊंगी असे फिल्मी डायलॉग त्यावेळी तिच्या डोक्यात सुरू असतात.

मात्र याच वेळी जे आई वडील आपल्या मुलीला समजवतात. तिला प्रेम करण्याची मुभा देतात आणि सांगतात की, हे सर्व ठीक आहे पण सध्या तुझं वय खूप लहान आहे. तू खूप शिक मोठी हो. त्या मुलाला देखील स्वतः च्या पायावर उभं राहूदे मग तू या गोष्टीचा निर्णय घे. त्यावेळी चित्र वेगळं होतं. यामुळे मुलीच्या मनात देखील आई वडिलांनाचा आदर आणि प्रेम अधिक वाढत. यामुळे मुलगी शिकते देखील आणि स्वतःच्या पायावर उभी राहून ती स्वतः चे निर्णय घेण्यासाठी सक्षम होते.

आई वडिलांची माया आणि प्रेम या दोन अशा गोष्टी आहेत ज्या ओढून किंवा जबरदस्तीने मिळत नाहीत. पण ज्या ज्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात योग्य वेळी या गोष्टी मिळतात ती व्यक्ती अख्खं जग जिंकते.

आता हे झालं दोन व्यक्तींच एक मेकांवर असलेलं प्रेम. मात्र या जगात अशाही काही विकृती आहेत ज्यांना एखाद्या मुलीने नाही म्हटल्यावर ती माझी नाही तर कुणाचीच नाही असा विचार करतात. मात्र या विकृतींना खत पाणी त्यांच्या घरातूनच दिलं जातं. न कळत आई वडील आपल्या मुलांना असं काही तरी शिकवत असतात.

जसं की मगाशी आपण वाचलं की, घरामध्ये मुलाच्या प्रेमाबद्दल काही समजल तर घरचे त्याची मजा घेतात, हसतात त्याला चिढवतात मात्र हे सर्व चुकीचं आहे. यामुळे तो मुलगा असं समजून बसतो की, त्या मुलीने आपल्याला हो म्हणावं आणि आपल्याच बरोबर राहावं. त्याच्या मनासारखं न झाल्यास अनेकदा मुलींवर बलात्कार आणि ॲसिड हल्ल्या सारख्या घटना घडतात. त्यामुळे पत्येक मुलाचं चांगल आणि वाईट वागणं हे त्या त्या व्यक्तीच्या पालकांवर अवलंबून असतं.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *