आमचं लग्न ठरणार होतं पण तितक्यात तीने…, ललित प्रभाकरची ती पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर नेहमीच अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. अशात नुकतेच अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. तर मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणेच अभिनेता ललित प्रभाकर. ललित सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर त्याच व्हायरल होण्याचं कारण दुसरं तिसरं काही नसून लग्न आहे.

ललित आपल्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करतो आहे. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. अनेक जण त्याला या व्हिडिओमुळे खूप प्रश्न विचारत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो एका मुली समोर उभा आहे. या दिघांमध्ये संवाद सुरू आहे. यात तो म्हणतो की, ” आमचं लग्न ठरणार होतं, पण तितक्यात आत मधून तिने आवाज दिला की, मम्मी चहा बनवण्यासाठी किती शिट्ट्या घेऊ” आता हा मजेशीर व्हिडिओ पाहून अनेक जण पोट धरून हसत आहेत.

ललितच्या अनेक मैत्रिणींनी त्याला यावर अनेक कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ आरजे श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. नुकताच ललितचा मिडीयम स्पायसी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो एका रेडिओ स्टेशनमध्ये आला होता. त्याच्याबरोबर या चित्रपटाची टीम देखील होती. यावेळी त्याने तिथल्या आरजे बरोबर लग्नाचा हा विनोदी व्हिडिओ शूट केला आहे.

मिडीयम स्पायसी या चित्रपटात ललित मुख्य भूमिकेत आहे. तसेच यामध्ये परणा पेठे, सई ताम्हणकर, सागर देशमुख, नेहा जोशी हे कलाकार देखील आहेत. ललित त्याचा अभिनय आणि आजवर छोटा आणि मोठा पडता दमदार गाजवला आहे. साल २००८ मध्ये त्याने छोट्या पडद्यावर आपलं पहिलं पाऊल टाकलं.

त्याने जिवलगा, कुंकू, आभास हा या मालिकांमध्ये अभिनय केला. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून. मोठ्या पडद्यावरील डोंबिवली या चित्रपटात देखील त्याने मोठी भूमिका साकारली. यातील त्याचा अभिनय अनेकांना आवडला होता. आता छोटा आणि मोठा पडदासह तो वेबसिरीजचे जग देखील गाजवत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *