केआरकेने साधला शारुख खानवर निशाणा, काय म्हणाला तुम्हीच पाहा….

दिल्ली | केआरके या नावाने प्रसिद्ध असलेला कमाल आर खान हेडलाइन्समध्ये येण्याची एकही संधी सोडत नाही. केआरके सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींवर वादग्रस्त आणि कधीकधी व्यंग्यात्मक ट्विट पोस्ट करत असतो. यावेळीही त्याने बॉलिवूडच्या किंग खानवर निशाणा साधला आहे. केआरकेने शाहरुख खानला त्याच्या तीन वर्षांच्या ट्विटवर फटकारले आहे.

आता त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “हे पहा! हा भाऊ शाहरुख खान आपल्याच जगात मग्न आहे. त्याचा असा विश्वास आहे की सूर्य त्याच्या इच्छेनुसार उगवेल आणि मावळेल. ज्यानी गेल्या 9 वर्षांत केवळ 5 चित्रपट केले ते बॉलिवूडचे मानकरी म्हणून घरी बसले आहेत.”

शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने ट्विटर वरती विचारलं होतं की तुम्ही बॉलीवूड पासून दूर का गेले आहात. त्यावर शाहरुख खानने हसत हसत उत्तर दिलं होतं की, मी स्वतःच एक बॉलीवूड आहे. शाहरुखच्या याच पोस्टवर केआरके आता हल्लबोल केला आहे.

मोठ्या ब्रेकनंतर शाहरुख खान आता बऱ्याच चित्रपटांमध्ये जळणार आहे. झिरो या चित्रपटानंतर तो बॉलिवूडमध्ये दिसलाच नव्हता. त्यानंतर आता तो लालसिंग चढ्ढा, ब्रह्मास्त्र, टायगर ३, जवान, डॉंकी अशा चित्रपटांमध्ये झळणार आहे. अशाच मागचा काळ त्याच्यासाठी खूप वाईट काय ठरला. त्याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती.

आमली पदार्थांप्रकरणी त्याच्या मुलाला अटक करण्यात आल्याने तो खूप खचला होता. माध्यमांवर त्याच्याविषयी अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत होत्या. अशा जातात तो या सर्वांमधून सावरलेला असून पुन्हा एकदा मोठा कमबॅक करत आहे. मात्र अशात केआरकेने पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *