चित्रपसृष्टी हादरली! केतकी माटेगावकरच्या भावाने केली आत्महत्या, आठव्या मजल्यावरून घेतली उडी; कारण पाहून धक्काच बसेल

मुंबई | टाईमपास या चित्रपटातून मोठी प्रसिध्दी मिळवलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिच्या आयुष्यातील अगदी जवळच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. केतकीच्या भावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उधी घेत आपले जीवन संपवले आहे. तिच्या भावाने उचलेल हे टोकाचं पाऊल नेमक कोणत्या कारणासाठी आहे हे जाणून घेऊ.

केतकीचा चुलत भाऊ अक्षय अमोल माटेगावकर याने शुक्रवारी आत्महत्या केली. त्याने हे पाऊल उचलण्याआधी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये समजते की, त्याने नोकरी न मिळाल्याने एवढं टोकाचं पाऊल घेतलं आहे.

अक्षय सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिकत होता. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्याने असं म्हटल आहे की, ” मी आयटी कंपनीत इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मी अर्जही केले होते. मात्र मला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे.”

अक्षयची आई म्हणजे केतकीच्या काकीचे नाव मीनल माटेगावकर असे आहे. त्या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, तर अक्षयचे वडील अमोल माटेगावकर हे एका मोठ्या कंपनीत काम करतात. या घटनेमुळे माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हिंजवडी पोलीस सदर प्रकरणी चौकशी करत आहेत. अशात सर्व माटेगावकर कुटुंबीय हादरले आहे. मात्र अद्याप केतकिने यावर काही प्रकिक्रिया सोशल मीडियावर दिलेली नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *