कट्टपाची मुलगी करते ‘या’ क्षेत्रात काम; ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टाकते मागे…

दिल्ली | बॉलिवूडला मागे टाकत आज टॉलिवूड खूप पुढे चाललं आहे. एकसे बढकर एक चित्रपट दक्षिणात्य सिनेसृष्टी घेऊन येत आहे. अशात साऊथच्या बाहुबली या चित्रपटाने तर मोठा रेकॉर्ड बनवला. चित्रपटाची कथा आणि ॲनिमेशन यामधून चित्रपटाने भन्नाट सीन शूट केले. त्यामुळे हा चित्रपट खूप गाजला.

या चित्रपटात प्रभासचा अभिनय खरोखर कौतुक करण्यासारखा होता. व्हिएफएक्स कमाल देखील या चित्रपटात दिसली. आता पर्यंत असा चित्रपट बॉलिवूडमध्ये देखील बनवला नाही. मात्र टॉलीवूडने कमालच केली. चित्रपटाची गाणी देखील खूप गाजली. समुद्रातून थेट आकाशातली वाट काढणारा हा चित्रपट थेटरमध्ये अगदी स्वप्नात असल्यासारखा वाटला.

याची कथा देखील खूप दमदार होती. साल २०१५ मध्ये बाहुबली चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याचा सिक्वल २०१७ मध्ये आला. त्यामुळे एकूण २ वर्षे कट्टपाणे बाहुबलीला का मारलं याच उत्तर चाहते शोधत होते. चित्रपटात कट्टपा हे पात्र अभिनेते सत्यराज यांनी साकारले आहे. त्यांनी या आधी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच बॉलिवूडमधील चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटात त्यांनी दीपिकाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अशात बाहुबली चित्रपट त्यांच्यामुळे देखील खूप गाजला.

अशात त्यांची मुलगी ही अगदी त्यांच्या सारखीच दिसते. पण तिचं राहणीमान एकदम हॉट एखाद्या मॉडेलला लाजवेल असे आहे. त्यांच्या मुलीचं नाव दिव्या असं आहे. ती दिसायला खूप सुंदर आणि नेहमी ग्लॅमरमध्ये असते. मात्र तरी देखील ती मनोरंजनाच्या दुनियेपासून खूप दूर आहे. ती अभिनय क्षेत्रात कार्यरत नाही. तिला समाज कार्याबद्दल आवड आहे. त्यामुळे ती अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करत असते.

दिव्या पेशाने एक न्युट्रिशनिस्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे. कारण ती एक आपली नैतिक जबादारी आहे असं ती मानते. त्यामुळे आज तिला जागतिक पातळीवर देखील ओळखले जाते.

काही दिवसांपूर्वीच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये तिने अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला होता. त्यामुळे अनेक कामं देखील तिने करून घेतली. तिच्या या स्वभावामुळे सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या कामाबद्दल सोशल मीडियावर नेहमी पोस्ट शेअर करते. सत्यजित यांच्या बरोबर देखील तिचे अनेक फोटो आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *