धक्कादायक! अभिनेत्री कतरिना कैफ थोडक्यात बचावली, हेलिकॉप्टरच्या अपघातातून वाचला जीव

मुंबई | वाईटकाळ कधी कुणावर येईल याचा काही नेम नसतो. कितीही जपून राहिले तरी नशिबात जे लिहिले आहे ते घडतेच. नशीब कोणीही बदलू शकत नाही. बॉलीवुड अभिनेत्री कतरीना कैफ आज तिच्या अभिनयाने घराघरात पोहचली आहे. तिचा अभिनय आणि तिच्या लूकचे लाखो चाहते आहेत. आपल्या कारकिर्दीत तिने आता पर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे.

अशात कतरीनावर एकदा खूप वाईट प्रसंग ओढवला होता. यामध्ये तिचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने ती बचावली. ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रकार तिच्या बरोबर घडला. खरतर ती घटना एवढी भयावह होती की त्यातून कुणाचाही जीव वाचणे शक्यच नव्हते.

कतरीनाने स्वतः तिच्या या अपघाताबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे. यावेळी मुलाखतीमध्ये हा प्रसंग सांगत असताना ती खूप भयभीत झाली होती. ती म्हणाली की, मीहेलिकॉप्टर मधनं प्रवास करत होते. त्यावेळी अचानक हेलिकॉप्टरला काय झालं हे मला समजलं नाही. खूप वेगाने हेलिकॉप्टर खालच्या दिशेने येऊ लागल्या. लँडिंगला बराचसा वेळ होता. मात्र तरी देखील आधीच हेलिकॉप्टर भर द वेगाने खाली येत होतं. यामध्ये माझा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र यातून मी कशीबशी वाचले.”

कॅटरिनाने आतापर्यंत अनेक मोठमोठ्या जाहिराती देखील केलेल्या आहेत. बॉलीवूड मध्ये तिच्या चित्रपटांची खूप चर्चा असते. तिने सलमान खान पासून ते रणवीर कपूर पर्यंत अनेक कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटांप्रमाणे तिची प्रेम कहाणी देखील नेहमीच चर्चेचा विषय होती.

मात्र या सर्वांना तिने आता पूर्णविराम लावत विकी कौशल बरोबर विवाह केला आहे. विकी कौशल आणि कॅटरिना या दोघांचा विवाह देखील अनेक चाहतांसाठी एक सुखद धक्का होता. कॅटरिनाने आत्तापर्यंत मैने प्यार क्यू किया, नमस्ते लंडन, भारत, टायगर जिंदा है अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *