भूलभुलैया 2 चित्रपटाच्या यशामुळे कार्तिक आर्यनला मिळाली सर्वात महागडी कार गिफ्ट; किंमत पाहून धक्काच बसेल

मुंबई | सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनचा भुलभुलैया २ हा चित्रपट खूप गाजतो आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील भले भले विक्रम मोडकळीस काढले आहेत. कंगना राणावतच्या धाकड या चित्रपटाला देखील कार्तिकच्या भुलभुलैय्या २ ने मागे पाडलं आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाला देखील भुलभुलय्या २ ने बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर दिली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करतो आहे.

चित्रपटाला रसिक प्रेक्षकांच मिळत असलेलं प्रेम आणि यश या दोन्ही गोष्टींमुळे कार्तिक आर्यन आणि त्याच्या चित्रपटाची संपूर्ण टीम भारावून गेली आहे. सगळीकडे चित्रपटाच्या यशाचा जल्लोष पाहायला मिळतोय.

अशात कार्तिकचा हा जल्लोष दुपटीने वाढला आहे. कारण टी सरीच्या अध्यक्षांनी कार्तिकला एक लक्झरियस कार गिफ्ट केली आहे. कार्तिकला त्यांनी स्वँकी McLaren ही महागडी कार गिफ्ट म्हणून दिली आहे.

ही एक जीटी कार असून हाय स्पीड आणि लाँग डिस्टन्स नुसार तिला डिजाइन केलं गेलं आहे. चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे कलाकारांना कार गिफ्ट मिळणं हे काही नवीन नाही. मात्र कार्तिक आर्यनला मिळालेल्या जीटी कारचा तो प्रथम भारतीय मालक आहे.

भारतामध्ये प्रथमच ही कार कार्तिकला मिळाली आहे. आता पर्यंत भारतात ही गाडी कुणाकडेच नव्हती. या गाडीची किंमत ३.७२ कोटी रुपये एवढी आहे. कार्तिक आणि भूषण कुमार यांचे या ऑरेंज रंगाच्या गाडीबरोबर अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटापासून ते भुलभुलैया २ या चित्रपटापर्यंत भूषण कुमार आणि कार्तिक ही जोडी एकत्र आहे आणि रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

भूलभुलैया २ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 92.5 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 49.50 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 21.40 कोटी एवढी कमाई केली. चित्रपटाचा बजेट पाहिला तर तर तो फक्त 80 कोटींचा होता. मात्र चित्रपटाने 184.32 कोटींची कमाई केली आहे

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *