हृदयद्रावक घटना! या प्रसंगामुळे कैलाश खेरने घेतली गंगेत उडी…

मुंबई | प्रत्येक व्यक्तीला यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. काहींना नशिबाने हे यश लवकर मिळते मात्र काहींना बराच संघर्ष करावा लागतो. मग यामध्ये अनेक जण जीव देण्यापर्यंत खचून गेलेले असतात.

सरांच्या दुनियेत कैलाश खेर हे एक खूप मोठं नाव आहे. त्याची गाणी एव्हडी सुमधुर आहेत की, त्याचे काही स्वर काणी पडताच प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. कैलाश खेरने आजवर त्याच्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे.

मात्र एवढी प्रसिध्दी आणि वैभव मिळवण्याआधीचा त्याचा संघर्ष फार मोठा आहे. त्याच्या आयुष्यात फार कठीण काळ येऊन गेला. यात त्याने अगदी स्वतःच जीवन देखील संपवलं होतं. मात्र त्याच्या मित्रांची कृपा म्हणून तो वाचला आणि आपल्याला त्याचा आवाज ऐकायला मिळाला.

कैलाश खूप गरीब कुटुंबातील आहे. त्याचे आई वडील भाड्याच्या घरात राहत होते. त्यामुळे तो २७ वर्षांचा झाला तेव्हा थोडी जमा पंजी करून त्याने एक प्लॉट विकत घेतला. मात्र या करारात त्याला फसवण्यात आले. त्याने तो प्लॉट तब्बल २२ लाख रुपये देऊन खरेदी केला होता. आई वडील आजवर भाड्याच्या घरात राहीले आता त्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून त्याने तो प्लॉट विकत घेतला होता.

२२ लाख ही रक्कम त्या काळी फार मोठी होती. त्यामुळे ती साठवण्यासाठी कैलाशने अपार कष्ट केले होते. ही घटना घडल्यावर त्याला वाटले की, आता आपले आयुष्य संपले. आपण काहीच करू शकत नाही. आलेल्या परिस्थितीवर मात करणं त्याला असह्य झालं आणि त्याने गंगेच्या पत्रात उदी घेतली. मात्र मित्रांना वाटले की तो पाय घासरून पाण्यात पडला त्यामुळे त्यांनी त्याला वाचवले.

जर त्यावेळी त्याचे मित्र तिथे नसते तर एव्हढा सुंदर गायक आपल्याला कधीच मिळाला नसता. पुढे त्याने ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी ऋषिकेश गाठलं. मात्र तिथेही त्याला काही जमेना त्यामुळे तो मुंबईमध्ये आला. इथे आल्यावर त्याने संगीतात नशीब आजमावले.

सुरवातीला त्याने अनेक जंगल आणि रेडिओ साठी गाणी गायली. अशात तेरे दिवाणी हे गाणं रिलीज झालं. हे गाणं एवढं गाजलं की, कैलाश भारावून गेला. आपल्या गाण्याला एवढी प्रसिध्दी मिळेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर त्याने एका पेक्षा एक हिट गाणी गायली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *