जान्हवी कपूरचा ‘हा’ निर्णय बेतनार होता तिच्या जिवावर, थोडक्यात बचावली अभिनेत्री

मुंबई | अभिनेत्री जान्हवी कपूर ही एक अशी अभिनेत्री आहे जिने खूप कमी कालावधीत मोठी झेप घेतली आहे. साल २०१८ मध्ये ‘कोलामावू कोकिला’ हा तमिळ भाषिक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर याचा हिंदी रिमेक म्हणजे ‘गुड लक जेरी’ या मध्ये जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.

या चित्रपटात तिच्या बरोबर एक अतरंगी घटना घडली होती. या घटनेत तिचा जीवही जाऊ शकला असता. हा पण ती घटना जान्हवीने स्वतः हुन ओढून घेतली होती. तर ही घटना काय होती हेच माहित करून घेऊ.

गुड कल जेरी या चित्रपटाचं शुटींग हे गेल्यावर्षी मकर संक्रांतीच्या दोन दिवस आधी सुरू झालं होतं. त्यावेळी कृषी विधेयकावरून अनेक गावांमध्ये तणावाचं वातावरण होतं. त्याच दरम्यान शुटींग सुरू असल्याने सेटवर जाण्या येण्यास खूप अडचणी निर्माण होत होत्या.

अशात जान्हवीचे शुटींग ज्या गावात सुरू होते तिथे देखील खूप आंदोलन आणि मोर्चे सुरू होते. तर त्या गावात असलेल्या सेट जवळ जाण्यासाठी तिला रिक्षाने प्रवास करावा लागत होता. ती रोज सेटवर रिक्षाने जायची आणि यायची.

अशात एक दिवस तिला रिक्षा चालवण्याचा खूप मोह झाला. तिला रिक्षा चालवायची होती त्यामुळे तिने तिच्या पूर्ण टीमला सांगितले तेव्हा अनेकांनी तिला विरोध केला. सर्व जण नाही बोलत होते मात्र तिला ती रिक्षा चालवायचीच होती. त्यासाठी तिने खूप हट्ट केला.

तसेच इतर कुणाचं ऐकेल ती जान्हवी कसली. तिने आता पर्यंत कधीच कुणाचे ऐकलेले नाही. मनाला वाटेल तसचं ती आता पर्यंत जगत आली आहे. तसेच ती खूप जिद्दी आहे. एकदा तिच्या डोक्यात कोणता विषय आला तर तो पूर्ण केल्याशिवाय ती शांत बसत नाही.

तिने रिक्षा चालकाला सांगितले तेव्हा रिक्षा चालकाने देखील तिला नकार दिला. त्यावेळी तिने त्या रिक्षा चालकाला खूप विनंती केली आणि कशी बशी रिक्षा मिळवलीच. आता रिक्षा चालकाला माहीतच होते की, आता आपल्या रिक्षाच काही खरं नाही. बीचाऱ्याने मनावर दगड ठेवून रिक्षा दिली.

त्यानंतर जान्हवी रिक्षा चालवू लागली. यावेळी तिला पाहून गावातले लोक एकटक तिच्याकडे पाहातच राहिले. कारण एक मुलगी रिक्षा चालवत आहे. ते पण एवढी सुंदर हे पाहून सगळे जण थक्क झाले होते. आपल्याकडे अगदी शहरात महिला रिक्षाचालक दिसली तरी अनेक जण तिच्याकडे कुतूहलाने आणि कौतुकाने पाहतात. तसेच अनेकांना हे मोठे विशेष वाटते.

मग जान्हवी तर एका खेडेगावात रिक्षा चालवत होती. त्यामुळे सर्वजण तिच्याकडे अशा पद्धतीने पाहणार हे स्वाभाविकच आहे. ती रिक्षा चालवत आहे हे पाहून तिची एक मैत्रीण याचा रील व्हिडिओ बनवायला हवा असं म्हणते.

त्यानंतर लगेचच ती आपला फोन काढते आणि त्यावर रील व्हिडिओ बनवायला सुरुवात करते. तेव्हा जान्हवी कधी रिक्षा कडे पाहते तर कधी त्या मुलीकडे पाहते आणि कधी तिला एकटक पाहणाऱ्या व्यक्तींकडे पाहते. या सर्व चक्करमध्ये रिक्षा वरील तिचं नियंत्रण सुटतं आणि धाडकन ती रस्त्यावर आदळते. या सर्वांमध्ये व्हिडिओ काढणारी मैत्रीण सुद्धा रस्त्यावर पडते.

हा सर्व प्रकार घडल्यावर ती स्वतः ला सावरते आणि आधी बघते काही तुटलं तर नाही. त्यानंतर गप्प ती शुटींगला जाते. तिकडून सुद्धा गप्प घरी येते. आता या सर्व प्रकारात तिचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने तसं काही झालं नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *