हृतिक रोशनला झाले अश्रू अनावर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

दिल्ली | अभिनेता हृतिक रोशन हा सध्या एक मोठ्या दुःखाला तोंड देत आहे. त्याच्या घरातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने तो आणि त्याचे कुटुंबीय खूप दुःखी आणि भावूक झाले आहेत. हृतिकने त्याच्या अगदी जवळच्या एका व्यक्तीला गमवल आहे.

त्याची आजी पद्मा राणी ओमप्रकाश यांची प्राण ज्योत मालवली आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पद्मा राणी या गेल्या अनेक दिवसांपासून काही आजारांनी ग्रस्त होत्या. अखेर १६ जून रोजी आजाराशी असलेली त्यांची झुंज संपली आणि त्यांचे निधन झाले.

पद्मा राणी या हृतिकच्या आईच्या आई होत्या. तीन वर्षांपूर्वीच त्याचे बाबा म्हणजेच पद्मा राणी यांचे पती वारले होते. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. पद्मा राणी या दिग्दर्शक निर्माते जे ओम प्रकाश यांच्या पत्नी होत्या.

ओम प्रकाश यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी भगवान दादा, आप के साथ, अर्पण, आस पास, आखिर क्यों?, आशा, अपनापन, आक्रमण आणि आप की कसम, आशिक हूं बहारों का, सारख्या अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच त्यांनी आंखें, आए दिन बहार के, आई मिलन की बेला, आया सावन झूम के सारख्या चित्रपटांत निर्मितीचे काम केले आहे.

माणसाचं वय झालं की, त्याला वेगवेगळे आजार जडतात. त्यामुळे ओम प्रकाश यांचे ७ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले. निधन झाले तेव्हा त्यांचे वय ९३ वर्षे होते. हृतिक रोशनच्या आई पिंकी रोशन या देखील आपल्या मुलाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांनी आता पर्यंत आपल्या आई वडिलांबरोबर अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हृतिक रोशन याच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने देखील बॉलिवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. लवकरच तो फायटर या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण हे दोन्ही कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *