प्रसिद्ध अभिनेता देत आहे ‘या’ दुर्मिळ आजाराशी झुंज; वाचून धक्काच बसेल

दिल्ली | हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट एका आजाराशी झुंज देत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी स्वतः GQ कव्हर स्टोरीच्या ऑगस्ट 2022 च्या लेखात ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की हा एक असा आजार आहे ज्यामध्ये तुम्ही लोकांचे चेहरे ओळखू शकत नाही, ज्याला प्रोसोपॅग्नोसिया म्हणतात. यापूर्वी, 2013 मध्ये देखील अभिनेत्याने याचा खुलासा केला होता.

या अभिनेत्याने पुढे सांगितले की, आता त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ब्रॅड पिटने असेही सांगितले की, जेव्हा त्याने आपल्या जवळच्या लोकांना या आजाराबद्दल सांगितले तेव्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. लोकांना माहित नाही की असा आजार आहे. नुकतेच ‘इश्क विश्क’ अभिनेत्री शहनाज ट्रेझरीवालानेही खुलासा केला होता की, तिलाही खरे चेहरे ओळखता न येण्याचा त्रास आहे.

पिटला अद्याप प्रोसोपॅग्नोसिया या आजाराचे निदान झालेले नाही. अभिनेत्याचे म्हणणे आहे की साल २०१३ मध्ये त्याला प्रोसोपॅग्नोसिया या आजाराचा त्रास होत असल्याचा संशय आला होता. त्यानंतर त्यानी एस्क्वायर मासिकाशी याबाबत चर्चा केली. त्यावर पुढे तो म्हणाला, ‘बरेच लोक माझा तिरस्कार करतात, कारण त्यांना वाटते की मी त्यांचा अपमान करत आहे.’

ब्रॅड पिट हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. Oceans Eleven या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा एक उत्तम चित्रपट केले. ब्रॅड हा ट्वेल इयर्स अ स्लेव्ह आणि मूनलाइट सारख्या चित्रपटांचा निर्माता आहे.

ब्रॅड पिटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने अँजेलिना जोलीशी लग्न केले होते. दोघांना मॅडॉक्स, पॅक्स, झाहारा, शिलो आणि जुळी मुले नॉक्स आणि विव्हिएन अशी एकूण सहा आपत्ये आहेत. पिट आणि जोली यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. अशात अजूनही त्या दोघांमध्ये संपत्ती आणि मुलं यामध्ये कोर्टात लढाई सुरू आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *