अभिनय क्षेत्र हादरलं! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन; १००हून अधिक चित्रपटाची केली होती निर्मिती

मुंबई | बालिका वधू या मालिकेने मोठा इतिहास घडवला होता. या मालिकेच्या बाबतीत एक दुखःद बातमी समोर येत आहे. या मालिकेच्या दिग्दर्शकांची प्राणज्योत मालवली आहे. बऱ्याच काळापासून त्या एका आजाराची झुंज देत होते. अखेर सोमवारी त्यांचे निधन झाले.

बालिका वधू या हिंदी मालिकेचे तरुण मजूमदार हे दिग्दर्शक होते. त्यांना मल्टीप्ल ऑर्गन मॉलफंक्शन एलिमेंट हा आजार झाला होता. यासाठी ते बराच काळ उपचार घेत होते. अशात त्यांची प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

14 जून रोजी तरुण यांना त्यांच्या आजारामुळे जास्त त्रास होऊ लागला होता. त्यामुळे कोलकत्ता येथील एसएसकेएम या रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. २० ते २५ दिवस त्यांनी या आजाराचा याच रुग्णालयात अटीतटीचा सामना केला. डॉक्टरांनी देखील त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले.

वयाच्या 92 व्या वर्षी सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हिंदी सिनेसृष्टी आणि बॉलीवूड मधील सर्वच कलाकारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहते तसेच कलाकार त्यांना सोशल मीडिया मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

तरुण यांच्या निधनानंतर बालिका वधू मालिकेतील सर्वच कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. अशात त्यांनी त्यांच्या कारकीर्द बालिका वधू या गाजलेल्या मालिकेसह कुहेली’, ‘श्रीमान पृथ्वीराज’, ‘दादर किर्ती’ अशा अनेक मालिका आणि चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *