दिवार चित्रपटातील छोटा अमिताभ आठवतोय का? कलाविश्व सोडून करतोय ‘हे’ काम

मुंबई | ७० आणि ८० च्या दशकात असे अनेक बालकलाकार होते ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकारही झाले. त्यावेळी बालकलाकारांना प्रचंड मागणी होती. कोणताही चित्रपट बघा, प्रत्येक चित्रपटाची सुरुवात एका गरीब मुलापासून होते आणि त्याची दुःखद कहाणी आणि गरीब मुलगा पुढे हिरो बनतो. असा पवित्रा पूर्वी अनेक चित्रपटांत दिसत होता.

त्या काळात मास्टर मयूर म्हणजेच मयूर राज वर्मापासून रवी वालेचापर्यंत अनेक बालकलाकार होते. असाच एक बालकलाकार होता मास्टर अलंकार म्हणजेच अलंकार जोशी. त्याने बालकलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मास्टर अलंकारने यश चोप्रा यांच्या ‘दीवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्याने खूप उत्तम बजावली होती.

७० च्या दशकात आलेल्या या चित्रपटानंतर मास्टर अलंकारला आणखीन चित्रपटांसाठी ऑफर मिळू लागल्या. अमिताभच्या ‘दीवार’नंतर मास्टर अलंकार हा सर्वाधिक मागणी असलेला बालकलाकार ठरला. त्याने ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘धडकन’ आणि ‘ड्रीमगर्ल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यश चोप्रा आणि राज कपूर अशा दिग्गज दिग्दर्शकांनी ज्यावेळी त्याला स्वतःच्या चित्रपटांसाठी निवडले त्यावेळी सर्वाधिक मानधनांमध्ये असलेल्या बालकलाकार म्हणून याचा पहिला नंबर लागत होता.

मात्र चित्रपटातील त्याची कारकीर्द ही बालपणापूर्तीच मर्यादित राहिली. नव्वदच्या दशकात त्याला फारसे चित्रपट मिळत नव्हते. त्यामुळे त्याने आयटी क्षेत्रात नाव कमावण्याचा निर्णय घेतला. अलंकार सध्या आयटी क्षेत्रात मोठे नाव कमवत आहे. संगणकाच्या सॉफ्टवेअर मध्ये त्यांनी आपला व्यवसाय जगभर पसरवला आहे. बालकलाकार होऊन त्याने जसं मनोरंजनातून जगभर नाव कमावलं तसेच आता तो आयटी क्षेत्रातून देखील मोठ नाव कमवत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *