दीपिका पदुकोण एका चाहत्यावर चांगलीच धडकली, म्हणली माझं लग्न…

मुंबई | प्रत्येक कलाकारासाठी आपला प्रेक्षक वर्ग आणि चाहते फार मोलाचे असतात. चाहते आणि प्रेक्षकांना खुश ठेवण्यासाठी कलाकार वाटेल ते करत असतात. मात्र या सर्वांमध्ये काही चाहते आपल्या मर्यादा विसरून जातात आणि आपल्या आवडत्या कलाकाराला कठीण जाईल असे कृत्य करायला सांगतात.

काही कलाकार आणि चाहत्यांमध्ये अशाच विचित्र मागण्यांमुळे बऱ्याचदा वाद देखील झालेले पाहायला मिळाले आहेत. अशात काही व्यक्ती मुद्दामून कलाकारांना त्रास देण्यासाठी विचित्र विधाने करतात. याचीच प्रचिती अभिनेत्री दीपिका पदुकोण इला देखील आली.

सोशल मीडियावर दीपिकाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या एका चात्याला खडसावून बोलताना दिसत आहे. दीपिका त्याची चांगलीच हजेरी घेते. कलाकारांच्या आयुष्यात असे कसे नेहमीच घडत असतात.

काही दिवसांपूर्वी दीपिका आणि तिचा पती रणवीर कपूर कॅलिफोर्निया येथे सुट्ट्या एन्जॉय करायला गेले होते. त्यावेळी एका सार्वजनिक ठिकाणी ते पोहोचले असता चाहतांनी त्यांना घेरले. अशात एकाच्या हाताने लांबून दीपिकाला “आय लव यू दीपिका” असा आवाज दिला… यावर दीपिका त्याच्यावर भडकली. तिने खरमरीत उत्तर दिले आणि ती म्हणाली की,”आता माझं लग्न झालेला आहे याचं जरा भान ठेवून बोल.” दीपिकाच्या या प्रतिक्रियेवर तिथे उपस्थित सर्वच व्यक्तींमध्ये एकच हशा पिकला.

दीपिका आणि रणवीर हे दोघे देखील जोर जोरात हसू लागले. हिंदी गाणी रणवीर कपूर हे बॉलिवूडच सर्वात मोठ आणि यशस्वी कपल आहे. या दोघांनी आजवर बॉलीवूडला अनेक ऐतिहासिक आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे राम लीला आणि बाजीराव मस्तानी अशा नावांनी देखील अनेक जण या दोघांना ओळखतात.

रणवीर आणि दीपिका या दोघांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्यांच्या लग्नावेळी सर्वच चहाते खूप खुश होते. लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. या जोडप्याच्या लग्नानंतर अनेक लग्नांमध्ये दीपिका आणि रणवीरचा लूक पाहायला मिळाला. अशात आता दीपिकाचा एका चाहत्याला ओरडतानाचा हा मजेशीर व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *