मोठे डोळे, कूरुळे केस आणि गुबगुबीत गाल! ओळखा पाहू ही अभिनेत्री आहे तरी कोण?

दिल्ली | प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील अनेक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो. गेलेला वेळ आणि सुंदर क्षण यांची आठवण झाली ही तेच फोटो पाहतो. आशात प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग असतो. आपल्या कामगिरीने कलाकार चाहते गोळा करतात.

अशात आपल्या आवडत्या कलाकार बालपणी कसा दिसत असेल असे प्रश्न अनेक चाहत्यांना पडतात. कलाकार देखील आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा बालपणीचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे.

तिचा हा फोटो पाहून अनेकजण ही नेमकी कोणती अभिनेत्री आहे याचा शोध घेत आहेत. अशात सोशल मीडियावर कुरुळे केस, गुबगुबीत गाल आणि सुंदर असा गुलाबी फ्रॉक घालून उभी बसलेली ही चिमुकली खूपच सुंदर दिसते आहे. तिचा फोटो पाहून चटकन तिला काजळी लावावी असे वाटते. कारण ती एवढे सुंदर आणि गोड दिसते आहे. तर मंडळी ही चिमुकली आता एक अभिनेत्री झाली असून ती बॉलिवूडवर कधी मस्तानी तर कधी लीला बनून राज्य करत आहे.

अगदी बरोबर ओळखलत ही दीपिका पदुकोण आहे. दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दीपिकाचा हा सुंदर बालपणीचा फोटो तिचा पती म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने हा फोटो दीपिकाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला शुभेच्छा देताना शेअर केला होता. यावर त्याने कॅपशन लिहीत म्हटले होते की, ” वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी मार्शमेलो.” आता तिच्या या फोटोवर चाहते नुसता लाइक्स आणि हार्ट इमोजिचा वर्षाव करत आहेत.

२००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे. उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली.

२००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवून दिले. तिचा सत्य घटनेवर आधारित छपक हा चित्रपट देखील खूप गाजला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *